मकरंद पाटलांचा गोरेंना टोला... म्हणाले, आधी घर, भावंडांकडे लक्ष द्या...मग वाईत लक्ष घाला...

Jaykumar Gore पारगाव येथे परिवर्तन पॅनलच्या सभेत आमदार जयकुमार गोरे यांनी मकरंद पाटील यांच्यावर टीका केली हाोती. त्याला मकरंद पाटील यांनी आज प्रतित्युत्तर दिले
Jaykumar Gore, Makrand Patil
Jaykumar Gore, Makrand Patilsarkarnama

-अश्पाक पटेल

Makrand Patil News : आधी आपलं पाय बघा, तुमचे भावंड एकत्र आहे का? आमची भावंडं एकत्र आहेत ते बघवत नाही वाटतं. आधी आपल्या भावंडाकडे, घराकडे लक्ष द्या, मगच माझ्या तालुक्यात लक्ष द्या, असा सल्ला देत आमदार मकरंद पाटील Makrand Patil यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे Jaykumar Gore यांचा समाचार घेतला.

लाोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विजयी सभेत बोलत होते. पारगाव येथे परिवर्तन पॅनलच्या सभेत आमदार जयकुमार गोरे यांनी मकरंद पाटील यांच्यावर टीका केली हाोती. त्याला मकरंद पाटील यांनीआज प्रतित्युत्तर दिले . या विजयी सभेच्या वेळी दत्तानाना ढमाळ, राजेंद्र तांबे, मनोज पवार,अजय भोसलेंसह नवनिर्वाचित संचालक व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या बाजार समितीतील 18 जागापैकी 17 जागेवर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. मकरंद पाटील म्हणाले, जनतेचा कौल आम्ही स्विकारला आहे. विजयी उमेदवाराने व कार्यकर्ते यांनी कोणतेही चुकीचे वक्तव्य करून नका,भविष्यात ही आपणास निवडणुकीस सामोरे जायचे आहे, याचे भान ठेवा, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.

Jaykumar Gore, Makrand Patil
Wai : कोकणातील या रस्त्यासाठी मकरंद पाटलांचे नितीन गडकरींना साकडे

तर या निवडणुकसाठी 164 उमेदवार अर्ज केले होते. यातील फक्त 18 जणांना उमेदवारी द्यावी लागली. उरलेल्या थांबावे लागले, यात नाराजी आली. परिणामी अपेक्षीत मतदान झाले नाही. एक जागा गेली, नजर लागु नये म्हणून टिळा असावा लागतो तरी दुष्ट लागु नये म्हणुन ही सीट आली असावी, अशी मिश्कील टिकाटिपण्णी श्री. पाटील यांनी केली. या बाजार समितीत 13 वर्षे न्याय देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला आहे. ठेवी ठेवल्यात आहेत तरी यापुर्वी पेक्षा अधिकचे जोमाने काम करून दाखवू असा विश्वास यावेळी आमदार पाटील यांनी दिला.

Jaykumar Gore, Makrand Patil
Amol Kolhe in Satara : साताऱ्यात अमोल कोल्हे अन् देसाई, गोरे, पाटलांत रंगल्या गप्पा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com