Maratha Kranti Morcha : सदाभाऊंचा डीएनए चेक करण्याची वेळ आली; खोतांवर मराठा ठोक क्रांती मोर्चा आक्रमक

Sadabhau Khot News : खरचं तुम्ही मराठा आहे की नाही याची शंका आहे.
dhananjay sakhalkar, Sadabhau Khot
dhananjay sakhalkar, Sadabhau Khot Sarkarnama
Published on
Updated on

Pandharpur News : ‘प्रस्थापित मराठे ७० वर्षे सत्तेवर होते, ते काय गांजा ओढत होते का? त्यांनी मराठ्यांना आरक्षण का दिले नाही? देवेंद्र फडणवीसांना घेरण्यासाठी आरक्षणाचे हत्यार वापरले जात असून, त्यासाठीच मराठ्यांसह अनेक समाजाची आंदोलने सुरू आहेत,’ असा आरोप रयत क्रांतीचे संस्थापक माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी नुकताच केला आहे. त्यांच्या या विधानावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा ठोक क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनंजय साखळकर यांनी सदाभाऊंना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

dhananjay sakhalkar, Sadabhau Khot
Ashish Shelar News : बाळासाहेबांच्या सुपुत्राने करून दाखवलं... शिवसेना आता "गर्व से कहों हम समाजवादी हैं" म्हणू लागली!

सदाभाऊ खोतांनी मराठा नेत्यांनी 70 वर्षांत आरक्षण का दिले नाही, असा सवाल उपस्थित करीत शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यावर साखळकर यांनी सदाभाऊ खोतावर निशाणा साधला आहे. ते पंढरपुरात बोलत होते. "सदाभाऊ खोत तुमचा डीएनए चेक करायची वेळ आली आहे," अशा शब्दांत त्यांनी खोतांना फटकारलं आहे.

प्रस्थापित मराठ्यांचे झेंडे घेऊन तुम्हा सर्वांना मोठे करण्यासाठी आमच्या बापाने व आम्ही ऊन, वारा, पाऊस कशाचीही परवा केली नाही. आज तुम्हीच मराठा नेत्यांवर टीका करीत आहात. खरंच तुम्ही मराठा आहे की नाही याची शंका आहे, टीका करताना विचारपूर्वक करा," असा सल्लाही साखळकर यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते सदाभाऊ खोत

मराठा आरक्षण प्रश्नांच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. मात्र, दुर्देवाने कोणीही मुळाशी जात नाही. फडणवीसांनी दिलेले आरक्षण टिकले होते. आघाडी सरकारने योग्य भूमिका न घेतल्याने आरक्षण टिकले नाही. सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी सर्वांना समान न्याय देणे गरजेचे असून, संपूर्ण आरक्षणाची फेरमांडणी करावी लागेल.

‘मराठ्यांच्या पोरांनी शेती केली तरी माती अन् शाळा शिकली तरी माती होत आहे. मराठा समाज खेड्यापाड्यामध्ये राहणारा, शेती करणारा समाज आहे. कालांतराने शेतीचे तुकडे झाले आणि शेतावर पोट भागत नसल्याने शिकलेल्या मराठा समातील मुले नोकरीसाठी बाहेर पडले. प्रस्थापित मराठे ७० वर्षे सत्तेवर होते. ते काय गांजा ओढत होते का? त्यांनी मराठ्यांना का आरक्षण दिले नाही. सध्या फक्त देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यासाठी आरक्षणाचे हत्यार वापरले जात आहे.

dhananjay sakhalkar, Sadabhau Khot
Bachchu Kadu News : बच्चू कडू श्रीरामाला करणार सोयाबीन, कापूस अर्पण; 'मेरा देश, मेरा खून’ मोहिमेसाठी अयोध्या...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com