Maratha Reservation News : मराठा, धनगर आरक्षणासाठी बाबासाहेब देशमुख मैदानात ; मुंडन करत पाठिंबा

Dr. Babasaheb Deshmukh News : शेतकरी कामगार पक्ष मराठा समाज बांधवांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
Dr. Babasaheb Deshmukh News
Dr. Babasaheb Deshmukh NewsSarkarnama
Published on
Updated on

Sangola News : महाराष्ट्रभर सुरू असणाऱ्या मराठा समाजाच्या आरक्षणसाठी (Maratha Reservation) शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पाठिंबा देत मुंडन करून राज्य सरकारचा निषेध केला. शेतकरी कामगार पक्ष मराठा समाज बांधवांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

सांगोला तालुक्यात आरक्षणाच्या मागणीचा रेटा वाढत असताना कडलास (ता. सांगोला) येथील आमरण उपोषणाला बसलेले दीपक पवार यांची भेट घेत मराठा आंदोलनाला पाठिंबा देत मंगळवारी स्व. गणपतराव देशमुख (Dr. Babasaheb Deshmukh) यांचे नातू बाबासाहेब देशमुख यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

Dr. Babasaheb Deshmukh News
Maratha Reservation: 'सरकारचा एकही निर्णय मान्य नाही, आंदोलकांना त्रास देऊ नका अन्यथा...'; जरांगे पाटलांचा इशारा

मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे ही शेतकरी कामगार पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यासाठी वाटेल ती किमत मोजायला तयार असल्याचे देशमुख म्हणाले. गेल्या कित्येक वर्षांपासून मराठा व धनगर समाज हातात हात घालून जगत आहेत. इतर समाजाच्या तुलनेत या दोन्ही समाजांची लोकसंख्या अधिक आहे. मात्र, पूर्वीपासूनच शेती, पशुपालन व्यवसायाशी हा समाज निगडित असल्याने शिक्षण, नोकरीपासून तो वंचित राहिला असल्याचेही ते म्हणाले.

त्यात आरक्षणाचा लाभही त्यांना मिळाला नाही. त्यामुळे तो मागास राहिला. त्यामुळे मराठा व धनगर समाजाला कोणत्याही परस्थितीत आरक्षण मिळायला हवे, या लढ्यात मी अग्रभागी असेन, अशी ग्वाही त्यांनी समाजबांधवांना दिली. या वेळी डॉ. देशमुख यांच्यासोबत दत्तात्रय टापरे, दत्तात्रय जाधव, नारायण बापू गायकवाड, जोतिराम काटकर, गजेंद्र गायकवाड, हणमंत गायकवाड, रमेश चव्हाण, संजय शेटे व चैतन्य गायकवाड या तरुणांनी आपले मुंडन करून मराठा आरक्षणासाठी विलंब करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध केला.

आरक्षणासाठी आजपर्यंत समाजातील शेकडो तरुणांनी आपले जीवन संपवले आहे. आत्महत्या आपल्यापुढील पर्याय नाही. आपण सरकारशी लढून आपल्या हक्काचे आरक्षण मिळवू. आरक्षणाच्या लढाईत ज्या तरुणांनी आपले जीवन समर्पित केले आहे. अशा समाज बांधवांच्या कुटुंबीयांना सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मदत करावी, अन्यथा राज्य सरकारला याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही देशमुख यांनी दिला.

Edited by : Amol Jaybhaye

Dr. Babasaheb Deshmukh News
Shivena Shinde Group News : शिंदे गटाला नगरमध्ये मोठा धक्का; 28 जणांचे सामूहिक राजीनामे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com