Maratha Reservation : आरक्षणाचा माझा फॉर्म्युला सरकारला नको आहे का? राठोडांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Haribhau Rathod slams Eknath Shinde : ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते.
Maratha Reservation
Maratha ReservationSarkarnama
Published on
Updated on

Beed : मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळावे, यासाठी सरकार सकारात्मक आहे, असे सांगणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी आरक्षणाचा फॉर्म्युला सांगितला. पण त्यांच्या या फॉर्म्युल्याकडे शिंदेंनी दुर्लक्ष केल्याची तक्रार राठोड यांनी केली आहे. 'माझा फॉर्म्युला सरकारला नको आहे का? असा सवाल हरिभाऊ राठोड यांनी उपस्थित केला आहे.

ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, आणि त्याचा फॉर्म्युला माझ्याकडे असून, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन हा फॉर्म्युला सादर केला आहे, असे राठोड म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Maratha Reservation
Bhanudas Murkute : विखे, थोरातांच्या कारखान्यांना क्षमता वाढीची परवानगी कशी मिळते? मुरकुटे संतापले

राज्यात आक्रमक झालेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. अशातच मराठा- कुणबी जात प्रमाणपत्र शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्या. शिंदे समितीने सोमवारी त्यांचा प्राथमिक अहवाल सादर केला होता. तो मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला असून, तो मंत्रिमंडळाने स्वीकारला आहे.

निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीने 13 पानांचा प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला. शिंदे समितीने आतापर्यंत एक कोटी 72 लाख दस्तावेज पाहिले त्यातून 11 हजार 530 कुणबी नोंदी असल्याचे आढळलेले आहे. कोणत्या जिल्ह्यात किती दस्तावेज आणि किती नोंदी आढळल्या याचा संपूर्ण चार्ट या प्राथमिक अहवालात देण्यात आला आहे.

दोन दिवसांपासून (30 ऑक्टोबर) राज्यात याच मागणीसाठी मराठा आंदोलकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध ठिकाणी मराठा समाज बांधवांकडून आंदोलन सुरू आहे, तर काल पुण्यात काही आंदोलन नवले पुलावर पोहोचले. त्यांनी मुंबई-बंगळुरू महामार्ग रोखून धरला होता.

Maratha Reservation
Maharashtra Government : ओबीसी नेत्यांची सुरक्षा वाढवली; अनेक ठिकाणी संघर्षाचे वातावरण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com