Maratha Reservation : पाचशे जणांवर गुन्हे, फक्त ऋषिकेश बेदरेलाच का अटक ? मराठा समाज रस्त्यावर

Manoj Jarange News : बेदरे याची अटक बेकायदा असल्याचे मराठा समजाचं म्हणणं आहे.
Maratha Reservation
Maratha Reservation Sarkarnama
Published on
Updated on

Beed : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि दगडफेक झाली होती. या प्रकरणी बीडच्या गेवराई येथील मराठा आंदोलक ऋषिकेश बेदरे याच्यासह चार जणांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे. बेदरे याच्या समर्थनार्थ आज (सोमवारी) गेवराईमध्ये मराठा समाजाकडून रॅली काढण्यात येणार आहे.

सराटे अंतरवली प्रकरणात जवळपास 500 ते 600 जणांना आरोपी केले आहे. यात केवळ ऋषिकेश बेदरे यालाच अटक का केली ? आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार असल्याचे सरकारने म्हटले होते. मात्र अद्यापपर्यंत गुन्हे मागे का घेतले नाहीत? यासह विविध मागण्या घेऊन गेवराईच्या शास्त्री चौकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासोबत बेदरे याचा फोटो भाजपने नेते नितेश राणे यांनी समाज माध्यमांवर व्हायरल केला होता. त्यानंतर नितेश राणे यांच्यासोबतच बेदरे याचा फोटोही व्हायरल झाला होता. बेदरे याची अटक बेकायदा असल्याचे मराठा समजाचं म्हणणं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Maratha Reservation
MLA Nilesh Lanke : मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर लंके पोहाेचले शेतकऱ्यांच्या बांधांवर

अंतरवली सराटीतल्या दगडफेकीनंतर ऋषिकेश बेदरे दोनच दिवसांमध्ये शरद पवारांच्या भेटीला जाऊन आला. त्यावेळी त्याच्या समवेत माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे हे देखील होते. मूळात ऋषिकेश बेदरे हा मूळचा गेवराईचा आहे. त्याच्यावर पोलिस ठाण्यात दरोडा, मारहाण, बेकायदा शस्त्र बाळगणे, रस्त्यात अडवून लूट, दारू विक्री, जुगार, वाळू तस्करी असे वेगवेगळे गुन्हे दाखल आहे.

Maratha Reservation
Thackeray Group : ठाकरे गटानं दहा नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी; लोकसभेसाठी मोर्चेबांधणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com