Maratha Reservation : बार्शीमध्ये चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न; दवाखान्यातच विषारी औषध...

Barshi News : रणजित मांजरे या २६ वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन केले होते.
Maratha Reservation
Maratha Reservation Sarkarnama
Published on
Updated on

Barshi : मराठा आंदोलनाचा राज्यात भडका उडाला असून, आंदोलकांकडून आमदारांची निवासस्थाने, पक्ष कार्यालये आणि व्यवसायांना टार्गेट केले जात आहे. मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचं दिसून आले. मराठा युवकांच्या आत्महत्येचे सत्र अजून थांबलेले दिसत नाही.

बार्शी तालुक्यातील देवगावमध्ये मराठा आरक्षणासाठी चौघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी आणि जरांगे पटलांना पाठिंबा देण्यासाठी या चौघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Maratha Reservation
Maharashtra Government : ओबीसी नेत्यांची सुरक्षा वाढवली; अनेक ठिकाणी संघर्षाचे वातावरण

रणजित मांजरे या २६ वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन केले होते. रणजित मांजरेवर उपचार सुरू असताना पाठिंबा म्हणून दवाखाना परिसरातच दीपक पाटील, योगेश मांजरे आणि प्रशांत मांजरे या तिघांनी ही विषारी औषध प्राशन करीत केला आत्महत्येचा प्रयत्न केला. हे तीनही त्याला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. चौघांवर ही देवगावमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जरांगेंच्या आरोग्यासाठी म्हसोबाला साकडे...

मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनास यश यावे आणि प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील तिऱ्हे गावच्या सकल मराठा समाजाकडून ग्रामदैवत म्हसोबाला दंडवत घालून मनोज जरांगे यांच्या आरोग्यासाठी साकडे घातले.

गावातील साखळी उपोषण सुरू असणाऱ्या स्थळापासून म्हसोबा मंदिरापर्यंत हे दंडवत घालण्यात आलं. या वेळी कोणत्याही पक्षाच्या पुढाऱ्याला गावात येऊ देणार नाही, अशी प्रतिज्ञा मराठा बांधवांनी घेतली आहे.

Maratha Reservation
Rana Jagjitsinh Patil : 'या' मतदारसंघाने दिला सलग ५५ वर्षे धोतर नेसणारा आमदार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com