Maratha Reservation: मराठा आंदोलनाचे राजकीय पडसाद; ग्रामपंचायत सदस्यांचे राजीनामा सत्र सुरूच

Maratha Reservation : राज्य सरकार आरक्षण देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने आपण हा राजीनामा देत असल्याचं या ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितलं आहे.
Maratha Reservation Protest
Maratha Reservation ProtestSarkarnama
Published on
Updated on

Satara : मराठा आंदोलनाचे आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. ग्रामपंचायत सदस्यपदाचा राजीनामा देण्याचे सत्र सुरू झाले आहे. पुणे जिल्ह्यात तीन जणांनी राजीनामे दिल्यानंतर हे राजीनामा देण्याचे सत्र आता सातारा जिल्ह्यात सुरू झाले आहे.

खटाव तालुक्यातील कान्हरवाडीच्या ग्रामपंचायत सदस्य कोमल जाधव यांनी थेट ग्रामपंचायत सदस्यपदाचा राजीनामा देऊन आरक्षणप्रश्नी सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे आता महिलासुद्धा आक्रमक होताना दिसत आहेत.

Maratha Reservation Protest
Maratha Aarakshan : नगरमध्ये 36 गावांमध्ये नेत्यांना 'नो एन्ट्री'; सदावर्ते यांचा पुतळा जाळला

दौंड तालुक्यातील कानगाव ग्रामपंचायतीतील तीन जणांनी राजीनामा दिला आहे. ग्रामपंचायत सदस्यत्वाचा या तिघांनी राजीनामा दिला आहे. कानगावच्या सरपंचांकडे हा राजीनामा सुपूर्त केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या तिघांनी राजीनामा दिला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार आरक्षण देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने आपण हा राजीनामा देत असल्याचं या ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितलं आहे.

मनोज जारंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षण मिळवण्यासाठी राज्यभर मराठा बांधवांनी ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात आता महिलाही मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचे चित्र आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय विविध गावांनी घेतला आहे.

नगर जिल्ह्यातील 36 गावांमध्ये राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांचा पुतळादेखील जाळण्यात आला आहे. "जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला गावात प्रवेश करू देणार नाही," अशी शपथ पंढरपूरजवळच्या गादेगाव येथील मराठा समाजाने घेतली आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून येथील मराठा बांधवांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या वेळी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णयही घेतला आहे.

Maratha Reservation Protest
Pratap Patil : मराठा आंदोलकांनी खासदार प्रताप पाटलांच्या गाड्या फोडल्या!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com