

Solapur News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा म्हणून नगरपरिषद निवडणुकीकडे पाहिले जात आहे. या निवडणुकीत एमआयएमने बार्शी व अक्कलकोटमध्ये चाचपणी केली आहे. बार्शीत नगराध्यक्षपदासाठी तर अक्कलकोटमध्ये नगरसेवकपदासाठी एमआयएमने उमेदवार दिला आहे.
सोलापूर शहरात एमआयएमकडे निर्णायक व महत्त्वपूर्ण ताकद आहे. आता नगरपरिषद निवडणुकीतून ग्रामीण भागाची चाचपणी होत आहे. बार्शीत एमआयएमने नगराध्यक्षपदासाठी खाजाबी पठाण यांना तर अक्कलकोटमध्ये सैफन शेख यांना नगरसेवकपदासाठी मैदानात उतरविले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही ताकदीने लढणार असल्याचे एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापुरात सांगितले होते.
मात्र, प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये शेवटपर्यंत गोंधळ राहिल्याने नगरपरिषद निवडणुकीत एमआयएमकडून मोठ्या प्रमाणात उमेदवार उतरविण्यात आले नाहीत. बार्शी व अक्कलकोट येथेच प्रत्येकी एक उमेदवार मैदानात आहे. एमआयएम सोलापुरात नव्या मित्रपक्षांच्या शोधात आहे. एमआयएमला सोलापुरात चांगला मित्रपक्ष मिळाल्यास महापालिकेतील सत्तेचे गणित एमआयएमभोवती फिरण्याची शक्यता आहे.
एमआयएमचे (AIMIM) सोलापूर शहराध्यक्ष फारुक शाब्दी यांनी सोलापूर महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून व्यूहरचना करण्यास सुरवात केली आहे. यापूर्वी 2017 च्या निवडणुकीत एमआयएमचे 9 नगरसेवक विजयी झाले होते. जवळपास 15 जणांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. यावेळी एमआयएम सोलापूर महापालिका निवडणुकीत अधिक ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे संकेत शहराध्यक्ष शाब्दी यांनी दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.