Shahu Chhatrapati News : कोल्हापुरात शाहू छत्रपतींना 'MIM'कडून पाठिंबा; महाविकास आघाडीनेच स्पष्ट केली भूमिका!

MIM MP Imtiaz Jalil : ...मात्र या पाठिंब्यावरून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राजकारण सुरू झाले आहे.
Shahu Chhatrapati and Imtiaz Jalil
Shahu Chhatrapati and Imtiaz Jalil Sarkarnama

Kolhapur Lok Sabha Constituency : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शाहू छत्रपती महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीमध्ये शाहू छत्रपती यांचे नाव उमेदवार म्हणून पुढे आल्यानंतर व प्रत्यक्षात त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लोकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे.

याचबरोबर अनेक संघटनांकडूनही त्यांना पाठिंबा मिळत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शाहू महाराज यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, या पाठिंब्यावरून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राजकारण सुरू झाले आहे. त्यावर आता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी पत्र काढून आम्ही एमआयएमकडे पाठिंबा मागितला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shahu Chhatrapati and Imtiaz Jalil
Dhananjay Mahadik Vs Satej Patil: सतेज पाटलांना दंगल घडवायची आहे का? धनंजय महाडिक यांचा रोख....

महाविकास आघाडीने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या निवडणुकीत अनेक संघटना, पक्ष अनेक ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत. परंतु कोल्हापूरसाठी भूमिका घेताना मात्र आपापल्या पक्षाची देशातील, राज्यातील भूमिका बाजूला ठेवून शाहू छत्रपती(Shahu Chhatrapati) यांना बिनशर्त पाठिंबा देत आहेत. या पार्श्वभूमीवर दि.21 एप्रिल 2024 रोजी एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांनी शाहू छत्रपती यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला.

निर्णय जाहीर करताना खासदार इम्तियाज जलील(Imtiaz Jalil) यांनी पत्रकार बैठकीत सांगितले होते की, 'मी माझ्या कोल्हापूरच्या टीमला शाहू छत्रपती यांना समर्थन देण्यास सांगितले आहे. शाहू छत्रपती यांनी मला फोन केला नाही. त्यांनी माझ्याकड़े समर्थन मागितलेले नाही. परंतु सर्वच राजकीय पक्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांवर आधारित राजकारण करतात.'

तसेच 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज कोण आहेत? त्यांचे समाजातील स्थान काय आहे? हे आम्हाला माहीत आहे. म्हणूनच मी ओवेसींना सांगितले की, शाहू छत्रपती यांच्यासारख्या चांगल्या उमेदवारांना मदत करण्याची आपली भूमिका असली पाहिजे. म्हणून आम्ही शाहू छत्रपतींना मागणी केली नसतानाही स्वतःहून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे,' असं इम्तियाज जलील म्हणाले होते.

Shahu Chhatrapati and Imtiaz Jalil
Hasan Mushrif News : आम्हीही काठी घेऊन दारात बसू; सतेज पाटलांच्या विधानावर मुश्रीफांचा पलटवार

तर 'हे सर्व पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की, एमआयएमसारख्या पक्षाकड़े आम्ही पाठिंबा मागितलेला नाही. त्यामुळे तो स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही. या विषयाचे विरोधकांकडून भांडवल करून समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. शाहू छत्रपती यांचा विजय निश्चित असल्यानेच असे प्रकार विरोधक करत आहेत. मात्र अशा प्रचाराला कोल्हापूरची सुजान जनता फसणार नाही, असे पत्रक काढून स्पष्टीकरण दिले आहे.

या पत्रकावर काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील(Satej Patil), राष्ट्रवादीचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे संजय पवार, आम आदमी पक्षाचे संदीप देसाई, शिवसेना ठाकरे गटाचे विजय देवरे यांच्या सह्या आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhr)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com