मंत्री गडाख ठरतायेत कर्डिलेंची डोकेदुखी

महाराष्ट्राचे ( Maharashtra ) जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) जिल्हाभर फिरून शिवसेनेची ( Shivsena ) ग्रामीण भागातील शाखांची पुनर्स्थापना करत आहेत.
Shankarrao Gadakh
Shankarrao GadakhSarkarnama

अहमदनगर : जिल्ह्यातील शिवसेनेकडून शिवसंपर्क अभियान अजूनही सुरूच आहे. या निमित्त राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख जिल्हाभर फिरून शिवसेनेची ग्रामीण भागातील शाखांची पुनर्स्थापना करत आहेत. या शाखा बांधणीतून शिवसेना जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समित्या, स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी करत आहे. या शाखा पुनर्स्थापनेतून शिवसेना नगर तालुक्यात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना मोठे आव्हान उभे करत आहे. Minister Gadakh is a headache for Kardile

Shankarrao Gadakh
मंत्री शंकरराव गडाख पारावरच्या गप्पात झाले दंग...

मंत्री शंकरराव गडाख यांनी 25 सप्टेंबरला नगर तालुक्यातील जिल्हा परिषद दरेवाडी गटातील व पंचायत समिती चिंचोडी पाटील गणातील शिवसेनेच्या आठ शाखांची पुनर्बांधणी केली होती. आज गडाखांनी नगर तालुक्यातील 15 गावांत जाऊन तेथे शिवसेना शाखांची पुनर्बांधणी केली. तसेच तालुक्यातील कौंडगाव-माथणी रस्त्यावरील डांगरपट्ट्यात असलेल्या खांडके या गावाला मंत्री गडाख यांनी दत्तक घेतले आहे. या गावात नगर तालुक्यातील शिवसेनेची पहिली कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

या निमित्त गडाख यांनी शेंडी (ता. नगर) येथे पत्रकारांशी संवादही साधला. यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, युवा सेना प्रमुख प्रवीण गोरे, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, गोविंद मोकाटे, नगर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, प्रकाश कुलट, पंचायत समितीचे सभापती संदीप गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार, इंजिनिअर प्रवीण कोकाटे, यांच्यासह सरपंच व शाखा प्रमुख उपस्थित होते.

Shankarrao Gadakh
सहकार विभागाची नगर तालुका बाजार समितीला ‘कारणे दाखवा’ नोटीस

मंत्री गडाख म्हणाले, मागील आठवड्यात शिवसंपर्क अभियानानिमित्त नगर तालुक्यात जो दौरा झाला. त्याला अतिशय उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्याच तोडीचा प्रतिसाद आज जेऊर ( ता. नगर ) आणि परिसरातील गावांतून मिळाला. आम्ही आज जवळपास 15 गावांमध्ये शिवसेनेच्या शाखांची पुनर्स्थापना केली. अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे मी स्वागत करतो. नगर तालुक्यात शिवसेनेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

शेतकरी, ग्रामीण भागातील युवक हा शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात वळतो आहे. येणाऱ्या काळातही नगर तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी आणि भक्कम करण्यासाठी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी हातात हात घालून काम करणार आहोत, असा विश्वासही मंत्री गडाखांनी व्यक्त केला.

Shankarrao Gadakh
वर्षभरांनी यशवंतराव गडाख यांच्या रंगल्या सवंगड्यांशी गप्पा : घेतला भाजीभाकरीचा अस्वाद

जुन्या बंधाऱ्यांची होणार दुरूस्ती

अनेक गावांत शेतकऱ्यांचे जवळपास सारखेच प्रश्न असतात. विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडे जलसंधारण विभाग दिल्यामुळे शेतकऱ्यांशी निगडीत हे खाते आहे. नगर तालुका हा नगर जिल्ह्यातील सर्वाधिक पाझर तलाव, छोटे बंधारे असणारा तालुका आहे. नगर तालुक्याला बंधाऱ्यांचे माहेर घर म्हटले तरी चालेल. या बंधाऱ्यांची दुरूस्ती व्हावी, अशी अनेक गावांतील शेतकऱ्यांची मागणी आहे. माझा प्रयत्न हाच राहणार आहे की, नगर तालुक्यातील जुने, नादुरूस्त बंधारे लवकरात लवकर दुरूस्त करण्याचा माझा प्रयत्न राहील, असेही मंत्री गडाख यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com