मंत्री शंकरराव गडाखांच्या गावाला 'माझी वसुंधरा'अभियानाचे बक्षीस जाहीर

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या रविवारी (ता. 5) रोजी बक्षिसाचे वितरण होणार आहे.
Sonai Grampanchayat
Sonai GrampanchayatSarkarnama

सोनई ( जि. अहमदनगर) - महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात राबविलेल्या माझी वसुंधरा अभियानात दहा हजार लोकसंख्येच्या पुढील गटात जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांच्या सोनईगावच्या ग्रामपंचायतीस उत्कृष्ट कार्याचे बक्षीस जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या रविवारी (ता. 5) रोजी बक्षिसाचे वितरण होणार आहे, अशी माहिती सरपंच धनंजय वाघ यांनी दिली. अहमदनगर महापालिकेलाही या अभियानाचे बक्षीस जाहीर झाले आहे. ( Minister Shankarrao Gadakh's village announced the prize of 'My Vasundhara' campaign )

मंत्री गडाखांच्या गावात फार पूर्वीपासून जलसंधारण, वृक्ष लागवडचे काम केले जात आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व यशवंत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांच्या प्रयत्नातून नेहमी पर्यावरण विषयी उपक्रम राबविण्यात आले आहेत. सोनई ग्रामपंचायतीने मंत्री गडाख व अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा स्पर्धेत भाग घेवून शासन नियमाच्या भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या पंचतत्वावर उत्कृष्ट काम केले.

Sonai Grampanchayat
सुजय विखेंचा जवळचा कार्यकर्ता शंकरराव गडाख, औटी यांनी फोडला...

वृक्ष गणना, वृक्षारोपण, बायोगॅस व सौर उर्जा बाबत काम करुन गावात प्लॅस्टिक व फटाके बंदी केली होती. प्रबोधनाचे भिंतीचित्र लावण्यात आले होते. पर्यावरण बाबतही मोठे काम केले असे ग्रामसेवक संदीप वाडेकर यांनी सांगितले.

माझी वसुंधरा अभियानचे बक्षीस घेण्यासाठी सरपंच वाघ,उपसरपंच प्रसाद हारकाळे, ग्रामसेवक वाडेकर, संगणक प्रमुख बाळू जाधव,सदस्य बापुसाहेब ओहळ मुंबईला गेले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते टाटा थिएटर, नरीमन पॉईंट सभागृहात बक्षीस वितरण ठेवण्यात आला आहे. कार्यक्रमास महसूल मंत्री, नगरविकास मंत्री, ग्रामविकास मंत्री व पर्यावरण मंत्री उपस्थित राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com