आमदार कानडेंकडून आरोग्य यंत्रणेची तपासणी

आमदार लहू कानडे ( Lahu Kanade ) यांनी शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला नुकतीच भेट दिली.
Lahu Kanade
Lahu KanadeSarkarnama
Published on
Updated on

श्रीरामपूर (अहमदनगर) : अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात घडलेल्या अग्नितांडवच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी तसेच ऑक्सिजन प्रकल्पाची देखभाल व दुरुस्तीची पाहणी करण्यासाठी आमदार लहू कानडे ( Lahu Kanade ) यांनी शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी आरोग्य यंत्रणेची पाहणी केली.

या प्रसंगी लहू कानडे म्हणाले, कोरोनाचा ( Corona ) नवीन विषाणू जगभर पसरत असला, तरी अद्याप घाबरण्याचे काहीही कारण नाही. परंतु सरकारने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करुन सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कोविड तपासण्या वाढविण्यासाठी आवश्यक उपकरणे उपलब्ध करावे. गरज पडल्यास प्रत्येक घराच्या सर्वेक्षणासाठी सज्ज राहण्याच्या सूचना आमदार लहू कानडे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला दिल्या आहे.

Lahu Kanade
लहू कानडे म्हणाले, काँग्रेस देशात असा एकमेव पक्ष की, ज्याची जपवणूक जनता करतेय...

कोरोनाचा नवा व्हेरियट रोखण्यासाठी येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात औषधांचा साठा वाढविण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. मे महिन्यात रुग्णालयाचे फायर सेफ्टी-ऑडिट झाल्यामुळे मुदत संपताच नव्याने ऑडिट करावे. राज्य सरकारने कोरोनाच्या नव्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा दिल्यामुळे आमदार कानडे यांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश बंड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजश्री देशमुख यांची भेट घेवून आरोग्य यंत्रणेची पडताळणी केली.

Lahu Kanade
मी लोकप्रतिनिधी आहे, तुमचा काॅन्स्टेबल नाही ! आमदार लहू कानडे निरीक्षकांवर संतापले

याप्रसंगी अशोक कानडे, विलास थोरात, सतीश बोर्डे यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. आमदार कानडे म्हणाले, प्रत्येक गावनिहाय आरोग्य कर्मचारी वर्गाचे नियोजन करुन प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपजिल्हा रुग्णालयांतील रुग्णवाहिका सुस्थित ठेवावी. नव्याने उभारलेल्या ऑक्सिजन प्रकल्पामध्ये नियमित स्वच्छता राखावी. जनरेटरला लागणाऱ्या इंधनासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी. तसेच सार्वजनिक आरोग्य विषयक बैठकीचे आयोजन करुन नवीन संसर्गाच्या सतर्कतेसाठी योग्य नियोजन करणार असल्याचे आमदार कानडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com