अकोले ( जि. अहमदनगर ) - अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यात भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) यांच्या विरोधात महाविकास आघाडीने मोट बांधली आहे. या निवडणुकीत सुगाव बुद्रुक येथील प्रचाराचा नारळ भाजपचे जिल्हा परिषदेतील गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी वाढविला. या प्रसंगी बोलताना जालिंदर वाकचौरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर ( Sitaram Gaikar ) यांच्यावर टीकेची झोड उठविली. Agasti Sahakari Sakharkarkhana Election News Update
जालिंदर वाकचौरे म्हणाले, ज्या गायकरांना माजी मंत्री पिचड यांनी ऊस तोड कामगार ते जिल्हा बँकेचा अध्यक्ष, अगस्ती, अमृत सागर, महानंदा या संस्थेवर महत्वाचे पदे दिले त्यांनी पिचड साहेबांचा विश्वास घात केला. बहुजनांचे नेते बनले. ते आमदार डॉ. किरण लहामटे यांचे होतील काय? आमदारांनी आजच सावध व्हावे. अन्यथा आमदारकीचे तिकीट कापण्यासाठी टोळी एकत्र येऊन तुम्हाला धोका देतील. सत्ता गेली की पाठ फिरविणारे हे लोक असल्याचा आरोप करताना जिथे पिचड यांना दगा दिला. तिथे आमदारांची काय तमा, असा आरोप त्यांनी केला.
नुकतेच राष्ट्रवादीत गेलेले कैलास वाकचौरे यांच्यावर टीकेचा रोख करताना ते म्हणाले, माजी मंत्री पिचड आजारी असताना कैलास वाकचौरे यांच्या कापड दुकान उद्घाटन प्रसंगी 'जसा माझा वैभव तसाच माझा कैलास' हे भावनिक उद्गार काढून कैलास वाकचौरे यांना आपलेसे केले. त्याच वाकचौरेनी सत्ता गेल्यावर पाठ फिरवली व टोळीत सहभागी झाले, असा टोलाही त्यांनी लगावला.
विठ्ठल चासकर, भाऊ पाटील नवले यांनी पतसंस्थांच्या माध्यमातून केलेले घोटाळे बाहेर काढण्याची वेळ आली आहे. लवकरच केंद्रीय मंत्री यांना भेटून चौकशी लावण्यात येईल. वैभव पिचड यांनी जशास तसे उत्तर द्यावे लागेल. देशात आपले सरकार असून राज्यातही सरकार येणार आहे. त्यामुळे अगस्तीची चिंता करू नका. मात्र स्वार्थी राजकारण करणाऱ्या टोळीपासून सावध राहा. सुरक्षित राहा, असे जालिंदर वाकचौरे यांनी सांगितले.
अकोले नगरपंचायत निवडणुकीत आमच्यामुळे गुलाल उधळला म्हणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यामुळेच तालुक्याला चांगले दिवस आले. नगरपंचायतमध्ये एकमेकावर चिखलफेक करणाऱ्या व ज्यांनी एकमेकांच्या कॉलर धरून हाणामाऱ्या केल्या ते आज आमदार, गायकर यांच्यासोबत जाऊन मांडीला मंडी लावून बसले आहेत. ती मोठी चूक केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड, अध्यक्ष गिरजाजी जाधव, शिवाजी धुमाळ, भाऊ खरात, अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, बाळासाहेब वडजे, सीताराम भांगरे, सीताराम देशमुख व मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.