आमदार रोहित पवारांनी विधानसभेत मांडली पोलिसांची व्यथा : म्हणाले...

पोलिसांच्या समस्या कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी विधानसभेत मांडत राज्य सरकारचे पोलिसांच्या समस्येवर लक्ष वेधले.
Rohit Pawar
Rohit Pawarsarkarnama

मुंबई - राज्यातील पोलिस 24 तास जनतेची सेवा करतात. या पोलिसांच्या समस्या कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी विधानसभेत मांडत राज्य सरकारचे पोलिसांच्या समस्येवर लक्ष वेधले. ( MLA Rohit Pawar presented the plight of police in the assembly: said ... )

आमदार रोहित पवार यांनी पोलिसांच्या विविध अडचणी व समस्या समजून घेऊन त्या संदर्भातील प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केले. राज्यातील सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी वैयक्तिक कुटुंबाची व घराची पर्वा न करता जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र रस्त्यावर असतात. दिवाळी असो अथवा कोणताही सण, उत्सव ही पोलिस मंडळी कायम जनतेच्या सुरक्षेसाठी तत्परतेने उभी असतात.

Rohit Pawar
आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून जामखेडला पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण

पोलिस बांधवांच्या अनेक दुर्लक्षित अडचणी व समस्या आहेत याकडे आमदार रोहित पवारांनी पोलिसांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नावर विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधून घेतले. सरकारनेही त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी अधिवेशनात बोलत असताना आमदार रोहित पवार यांनी पोलिसांसाठी असलेल्या कॅशलेस रुग्णालयांच्या संख्येत वाढ करावी, निवृत्तीनंतरही त्यांना आरोग्यसेवा मिळावी, पोलिसांवर येणारा ताण कमी करण्यासाठी त्यांच्या किरकोळ रजेमध्ये वाढ करावी तसेच पोलिसांना राहण्यासाठी प्रशस्त व चांगली निवासस्थाने सरकारतर्फे उपलब्ध करून द्यावी, अशा पोलिसांच्या बाबतीतील विविध अडचणींकडे राज्य सरकारच्या गृह विभागाचे लक्ष वेधले.

Rohit Pawar
Video: भाजपचं हे राजकारण केवळ मुंबईच्या निवडणुकींसाठीच; रोहित पवार

यावेळी लक्षवेधीला उत्तर देत असताना महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत येत्या काळात नक्कीच या संदर्भात सकारात्मक पावले उचलली जातील असे बोलून दाखवले.

दरम्यान, पोलिसांच्या घरांच्या आणि इतरही बाबतीत असलेली सध्याची परिस्थिती ही आमदार रोहित पवारांनी बोलताना विषद केली. त्यामुळे पोलिसांसाठीच्या अडचणी या आता राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच सोडवल्या जातील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com