Mangalvedha, 08 July : भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी विश्वकरंडक जिंकल्यामुळे सध्या भारतात सर्वत्र क्रिकेटमय वातावरण आहे. अनेक जण क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटताना दिसून येत आहेत. विधानसभेचे तालिका सभापती तथा पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आलेला नाही. छोट्या भाच्यासोबत क्रिकेट खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून भाच्यासोबतचा त्यांचा संवादही मजेशीर आहे.
मुंबईत पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू असून विधानसभेत (Assembly) आमदार आणि तालिका सभापती म्हणून समाधान आवताडे (Samadhan Autade) यांनी केलेली फलंदाजी आणि भाच्यासोबत केलेली फलंदाजी तालुक्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.
पंढरपूर-मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांनी भगीरथ भालके यांचा पराभव करत आमदारकीवर मोहोर उमटवली होती. पोटनिवडणुकीत आवताडे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताकद पणाला लावली होती. त्या निवडणुकीनंतर निवडून आलेल्या आवताडे यांच्यावर गोव्यातील काही मतदारसंघाची जबाबदारीही देण्यात आली होती. त्या जबाबदारीवर तो मतदारसंघ जिंकून आवताडे हे खरे उतरले होते.
आमदार समाधान आवताडे यांना शेवटच्या अधिवेशनात तालिका सभापती म्हणून संधी देण्यात आली आहे. प्रथमच निवडून आलेल्या आवताडे यांनी विधिमंडळाच्या कामकाजाचा कसलाही अनुभव नसताना विधानसभा कोणत्याही वादाविना उत्तमरित्या चालवली आहे. विधानसभेत सत्ताधारी व विरोधी पक्षांना बरोबर घेत कामकाज चालवले.
हे शेवटचे अधिवेशन असल्यामुळे प्रत्येक आमदार आपापल्या मतदारसंघातील प्रश्नावर आक्रमक होऊन त्याची सोडवणूक व निधीची उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. अशा परिस्थितीत आवताडे यांनी नवखेपणा जाणवू न देता विधानसभेचे काम हाताळले आहे. विधानसभेच्या कामकाजाला शनिवार आणि रविवार असे दोन सुटी होती. त्या सुटीत मंगळवेढ्यात आलेल्या आमदार आवाताडे यांनी आपल्या भाच्यासोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
तालिका सभापती म्हणून समाधान आवताडे यांनी ज्या संयमाने बॅटिंग केली. त्याच पद्धतीने आगामी दोन महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही आवताडे यांना फलंदाजी करावी लागणार आहे. त्याची तयारी त्यांनी आतापासून सुरू केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.