विधानसभेत बोलताना त..त..प..प व्हायचे : आवताडेंनी सांगितली आप बिती

तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही उभा राहून प्रश्न क्रमांक तेवढा वाचा. बाकीचं मी उचलून धरतो, असा शब्द दिल्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील प्रश्न मांडण्याचे धाडस वाढले
Samadhan Avatade
Samadhan AvatadeSarkarnama

मंगळवेढा (जि. सोलापूर) : भाजपचा (BJP) १०६ वा आमदार म्हणून मी पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत मी निवडून आलो. विधानसभेत नवखा होतो. काय बोलायचं.. कसं बोलायचं... किती वेळ बोलायचं.. याची माहिती नव्हती, त्यामुळे पहिल्याच अधिवेशनात बोलताना माझे त.त..प..प झाले. परंतु तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तुम्ही उभा राहून प्रश्न क्रमांक तेवढा वाचा. बाकीचं मी उचलून धरतो, असा शब्द दिल्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील प्रश्न मांडण्याचे धाडस वाढले, असे आमदार समाधान आवताडे (Samadhan Avatade) यांनी सांगितले. (MLA Samadhan Avatade told about the situation in the Legislative Assembly)

आवताडे शुगर अँड डिस्टलरीज प्रा.लि. च्या प्रथम गळीत हंगामाच्या शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात आमदार आवताडे प्रास्ताविकात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते.

Samadhan Avatade
पुणे जिल्ह्यातील बलाढ्य शक्तीला आम्ही जागा दाखवणार : हर्षवर्धन पाटलांचा इशारा कोणाकडे

आवताडे म्हणाले की, माझ्यासारख्या नवख्या आमदाराला ताकद देण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यामुळे आम्ही मतदारसंघातील प्रश्न आता प्रभावीपणे मांडण्यास सुरुवात केली आहे. पोटनिवडणुकीतील विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या प्रशांत परिचारक यांचे आभार मानत पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान नंदूरचा कारखाना बंद असल्याचे समजताच फडणवीस यांनी या भागातील तरुणांना रोजगार पुन्हा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने लक्ष घातले. पण, साखर कारखानदारीत उतरायची इच्छा नव्हती, त्यांच्या मदतीने या कारखान्याचा बॉयलर पेटला आहे.

Samadhan Avatade
अजितदादांची राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला दुसऱ्या दिवशी दांडी; नाराजीची चर्चा

पंढरपूर-मंगळेवढा या दोन तालुक्यांच्या मतदारसंघात तीन महिन्यांत ६०० कोटींचा निधी दिला असून पाणी हे आग विझवण्यास कारणीभूत ठरते. मात्र, मंगळवेढ्याचे राजकारण पेटवण्याचे कारण पाणी ठरले. तालुक्यातील २४ गावच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी उपमुख्यमंत्री सातत्याने प्रयत्न करीत आहेत या योजनेत असलेल्या त्रुटीची पूर्तता नुकतीच केली आहे. जवळपास ७१८ कोटींच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी उपमुख्यमंत्रीच पाठपुरावा करत आहेत, असेही आवताडे यांनी स्पष्ट केले.

Samadhan Avatade
शिवसैनिक गुंडच; पण... : विजय शिवतारेंचे विधान

आवताडेच २०२४ ला विधानसभेचे उमेदवार?

आमदार आवताडेंनी आपल्या प्रास्ताविकातून प्रलंबित विकासकामाची मागणी केल्यानंतर या मागणीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढ्यातील प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात आवताडे यांनी केलेल्या मागण्याची नोंद घेतली आहे. मागणी केलेले सर्व प्रश्न मार्गी लावून भविष्यात कामाच्या भरोश्यावर पुन्हा मत मागण्यास जाऊ, असा विश्वास दिला, त्यामुळेच २०२४ चा उमेदवारदेखील आवताडे हेच असल्याचे संकेत दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com