शिवसैनिक गुंडच; पण... : विजय शिवतारेंचे विधान

बाळासाहेब ठाकरेंचे बंगले-इमारती यांचे वारस उद्धव ठाकरे असतील. पण, बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारस हे एकनाथ शिंदे व बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शिवसैनिक आहेत.
Vijay Shivtare
Vijay ShivtareSarkarnama
Published on
Updated on

इंदापूर (जि. पुणे) : बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) बंगले-इमारती यांचे वारस उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) असतील. पण, बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारस हे एकनाथ शिंदे (Eknath shinde) व बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शिवसैनिक आहेत, असा दावा माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay shitare) यांनी केला. ‘बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे ‘शिवसैनिक (shivsainik) गुंडच आहेत; पण जनतेच्या हितासाठी.’ याची आठवण करून देत शिवतारे यांनी कार्यकर्त्यांना विरोधकांच्या आरोपांना जशास तसे उत्तर देण्याचे आवाहन केले. (Eknath Shinde is the true heir of Balasaheb Thackeray's thoughts: Vijay Shivtare)

इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या विस्तार वाढीसाठी व आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाच्या आढावा बैठकप्रसंगी शिवतारे बोलत होते. यावेळी शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष सुदर्शन साखरे, अशोक देवकर, भाजपचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे, सुरेंद्र जेवरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Vijay Shivtare
घसा बसलेला असूनही पवारांनी भाषण करत कार्यकर्त्यांना केले चार्ज!

शिवतारे म्हणाले की, पुणे जिल्ह्यात फक्त पवारांची शक्ती आहे, असे नाही. आता माझ्यासह हर्षवर्धन पाटील, भीमराव तापकीर, राहुल कुल, शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून शिवसेना-भाजपचीही शक्ती तयार झाली आहे. यातूनच आगामी निवडणुकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत बारामतीत सेना-भाजपचाच खासदार निवडून येईल.

Vijay Shivtare
शरद पवार ब्रीच कॅंडीतून थेट शिर्डीत राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दाखल

ज्यांच्याशी आम्ही लढलो, त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापन केली आणि सरकार असतानाही सेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला गेला. शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात आले आणि शिवसेना संपवण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीने केले, असा आरोपही त्यांनी केला.

Vijay Shivtare
आमदार बबनराव शिंदेंनी पंढरपुरात पुन्हा घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट!

महाविकास आघाडीचे सरकार अजून राहिले असते तर शिवसेनेसह लोकांचेही वाटोळे झाले असते; म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली क्रांती करीत भाजपबरोबर सरकार स्थापन करण्यात आले. शिंदे-फडणवीस सरकार आता सर्वसामान्य लोकांचे सरकार म्हणून काम करत आहे आणि पुढचा काळ हा शिवसेना-भाजपसाठी उज्वल असेल असा, विश्वासही शिवतारे यांनी व्यक्त केला.

बंडखोरी नव्हे क्रांती..

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली म्हणून ठाकरे गट ओरडत आहे. शिंदेंनी बंडखोरी नाही, तर त्यांना चाळीस आमदारांसह माझ्यासारख्या ५२ माजी आमदारांनी होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचून दाखवत गळ घातली आणि त्यातूनच क्रांती झाली, असे सांगत गद्दार म्हणणाऱ्यांना शिवतारे यांनी टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com