तुम्ही काय दादा लागून गेलात का? वीजप्रश्नावरून आमदार आवताडे संतापले!

आमदार समाधान आवताडे यांचा पंढरपूर मतदारसंघात गावभेट दौरा
MLA Samadhan Avtade Latest News, Latest Political News in Marathi
MLA Samadhan Avtade Latest News, Latest Political News in MarathiSarkarnama
Published on
Updated on

मंगळवेढा (जि. सोलापूर) : गावभेट दौऱ्यात विजेच्या प्रश्नावर बघतो, करतो, अशी भूमिका घेणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) यांनी सर्वांसमोर झापले. मी एकतर बोलत नाही. तरीही तुम्ही बघतो, करतो अशी उत्तर देता, तुम्ही काय दादा लागून गेलात का, असा सवाल करत तुम्ही ‘त्या नादाला लागू नका,’ अशा शब्दांत महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आमदार आवताडे यांनी सुनावले. (MLA Samadhan Avtade's village visit in Pandharpur constituency)

गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने आमदार आवताडे यांनी हिवरगाव, खोमनाळ, भाळवणी, जालीहाळ, हाजापूर, सिद्धनकेरी, रड्डे, शिरनांदगी, मारोळी, महमदाबाद, पडोळकरवाडी, लोणार आदी गावांचा दौरा केला. त्यावेळी भाळवणी (ता. मंगळवेढा) येथे बोलताना त्यांनी वरील इशारा दिला. दौऱ्यात पाणी आणि वीज या महत्त्वाच्या प्रश्नावर जोर देण्यात आला. नागरिकांच्या तक्रारी ऐकून आमदारदेखील आवाक झाले होते. (MLA Samadhan Avtade Latest News)

MLA Samadhan Avtade Latest News, Latest Political News in Marathi
अकरा सरपंच, एका उपसरपंचास पदावरून काढून टाकले

आमदार आवताडे म्हणाले की, मी माझ्या कार्यकर्त्याचा आमदार नसून पंढरपूर व मंगळवेढा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेचा आमदार आहे. आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी मी बांधील असणार आहे. एकतर मी बोलत नाही. बोललो तर संबंधिताला सोडत नाय. बघतो, करतो अशी उत्तर देता, तुम्ही काय दादा लागून गेलात का, असा सवाल करत तुम्ही त्या नादाला लागू नका, असा इशारा आवताडे यांनी महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.

MLA Samadhan Avtade Latest News, Latest Political News in Marathi
अनिल कदम म्हणतात, आमच्या ओझरच्या समस्या सोडवा!

हिवरगाव येथे डोंगरगाव तलावातील गाळ काढून उजनी धरणाचे पाणी सोडण्यात यावे, भाळवणी येथे मंगळवेढा-निंबोणी रस्त्याच्या दुरुस्ती करण्यात यावी. शेतीसाठी अतिरिक्त चार डीपीचीही आवश्यकता असून ते तातडीने बसावेत, अशी मागणी करण्यात आली. अर्धवट कामे पूर्ण करावीत. जालीहाळ येथे नव्याने उभारण्यात आलेल्या डीपी चालू करण्यास महावितरणकडून चालढकल होत असल्याची तक्रार दिगंबर माने यांनी केली. हाजापूर येथे वन विभागाच्या नोटिसा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. रड्डे येथे शिरनांदगी तलावातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली, शिरनांदगी ओढ्याला कालव्याचा दर्जा, तलाव आणि कालव्याचे एकाच विभागात विलीनीकरण करणे, वीज चोरीच्या कारणावरून घरगुती वीज ग्राहकांना त्रास देत येत असल्याची तक्रार करण्यात आली. मारोळी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत तक्रार व तलावात पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली. महमदाबाद-हुन्नूर येथे घरकुलासाठी मोफत जागा देण्याची मागणी जगू गोरड यांनी केली.

MLA Samadhan Avtade Latest News, Latest Political News in Marathi
मी भाजपचा महापौर, म्हणून आकसाने निवासस्थान सोडायला लावले!

आमदार आवताडे यांच्या समवेत माजी सभापती प्रदीप खांडेकर, दामाजी कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण, सुरेश भाकरे, राजीव बाबर, बसवेश्वर पाटील, येताळा भगत, गौरीशंकर बुरकुल, अशोक माळी, राजेंद्र सुरवसे, अविनाश मोरे यांच्यासह गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा उपअभियंता शैलेंद्र गुंड, महावितरण आरोग्य शिक्षण जिल्हा परिषद बांधकाम व ग्रामीण पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com