आमदार संग्राम जगताप म्हणाले, आम्ही महाविकास आघाडी बरोबरच...

संत निवृत्तीनाथ महाराज यांचा संजीवन समाधी सोहळ्यात आमदार संग्राम जगतापही ( Sangram Jagtap ) भक्तिरसात रंगून गेले.
MLA Sangram Jagtap And Avinash Ghule
MLA Sangram Jagtap And Avinash GhuleRaju Kharpude
Published on
Updated on

अहमदनगर - संत निवृत्तीनाथ महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आज अहमदनगर व त्र्यंबकेश्वर ( जि. नाशिक ) येथे मोठ्या भक्तिभावात पारपडला. अहमदनगर येथील सोहळ्यात वारकऱ्यांबरोबरच आमदार संग्राम जगतापही ( Sangram Jagtap ) भक्तिरसात रंगून गेले. ( MLA Sangram Jagtap said, we are with Mahavikas Aghadi ... )

त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी 13 जूनला पंढरपूरच्या दिशेने निघाली. काल ही पालखी अहमदनगर येथे आली. सालाबाद प्रमाणे अहमदनगरच्या मार्केटयार्ड परिसरात दोन दिवस ही पालखी थांबली आहे. आजच्या दिवशी संत निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वरला संजीवन समाधी घेतली होती. तसेच त्यांची पालखी अहमदनगरमध्ये आली असल्याने आज हा संजीवन समाधी सोहळा त्र्यंबकेश्वर व अहमदनगर अशा दोन ठिकाणी झाला.

MLA Sangram Jagtap And Avinash Ghule
थोरात, लंके, संग्राम जगताप, रोहित पवारांसंदर्भात सुजय विखेंनी केले हे वक्तव्य

अहमदनगर येथील संजीवन समाधी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप सहभागी झाले. त्यांनी भाविकांच्या पंगतीत जेवणही वाढले. या वेळी अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, गोविंद सांगळे, मधुकर केकाण, बबन आजबे, नारायण गिते, सतीश शेळके, बहिरू कोतकर, रामा पाणसम्बल, रवींद्र भोसले, तबाजी कार्ले आदी उपस्थित होते.

या प्रसंगी त्यांना राज्यातील राजकीय घडामोडी संदर्भात विचारले असते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. आम्ही सर्व महाविकास आघाडी बरोबरच आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

पालखी सोहळ्यात समाधी संस्थानचे विश्वस्त जयवंत गोसावी महाराज यांनी काल्याचे कीर्तन सादर केले. सकाळपासूनच मार्केट यार्ड परिसरात गर्दी झाली होती. सकाळी 11 वाजता भजन व कीर्तनाने मार्केट यार्ड परिसर भक्तिरसात न्हावून निघाला. आमदार संग्राम जगताप यांनीही या पालखीचे दर्शन घेत सोहळ्यात सहभाग घेतला.

MLA Sangram Jagtap And Avinash Ghule
पब्लिसीटीस्टंटला नव्हे मी शहर विकासाला महत्त्व देतो - आमदार संग्राम जगताप

जगताप कुटुंबाची परंपरा

आमदार संग्राम जगताप हे आज वारकऱ्यांबरोबर दिसले. यामागे त्यांच्या कुटुंबाची मोठी भक्ती परंपरा आहे. त्यांचे आजोबा स्वर्गीय बलभीमराव जगताप हे वारकरी संप्रदायातील वारकरी होती. हीच परंपरा त्यांचे वडील आमदार अरूण जगताप यांनी जपली. तीच परंपरा आमदार संग्राम जगताप यांनी पुढे सुरू ठेवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com