Madha Loksabha : पुन्हा दोस्ताना; संजय शिंदेंचा खासदारकीसाठी निंबाळकरांना पाठिंबा, अधिक मतांनी निवडून आणण्याचा निर्धार

Sanjay Shinde Supports Nimbalkar : आमदार शिंदेंनी २०१९ मध्ये निंबाळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या तिकिटावर माढ्यातून निवडणूक लढवली होती.
Sanjay Shinde-Ranjitsinh Naik nimbalkar
Sanjay Shinde-Ranjitsinh Naik nimbalkarSarkarnama

Solapur politics : राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे आमदार शिंदेंनी २०१९ मध्ये निंबाळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या तिकिटावर माढ्यातून निवडणूक लढवली होती. (MLA Sanjay Shinde supports Nimbalkar for MP)

माढा लोकसभा मतदारसंघात सध्या उमेदवारीसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे. मोहिते पाटील कुटुंबीयांतील धैर्यशील यांची लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. उलट मोहिते पाटील समर्थकांकडून धैर्यशील मोहिते पाटील यांचा फोटो लावून ‘आमचं ठरलंय...खासदारकीचं’ म्हणत सोशल मीडियावरून पोस्ट व्हायरल केल्या आहेत. त्यामुळे भाजपत उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे.

Sanjay Shinde-Ranjitsinh Naik nimbalkar
Sangola Water Issue : सांगोल्यात पाणी पेटलं; खासदार निंबाळकर म्हणाले, ‘कॅनॉलवर येऊन शेतकऱ्यांना पाणी देईन’

एकीकडे भाजपमध्ये स्पर्धा असताना खासदार निंबाळकर यांनी मात्र मोहिते पाटील यांना वगळून आपली तयारी चालवली आहे. त्यासाठी त्यांनी माढ्याच्या शिंदे बंधूंना गळाला लावल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी आमदार संजय शिंदे यांचे बंधू आमदार बबनराव शिंदे यांनीही निंबाळकर यांना दोन लाख मताधिक्क्याने निवडून आणू, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता आमदार संजय शिंदे यांनीही निंबाळकरांना पाठिंबा दिला आहे.

Sanjay Shinde-Ranjitsinh Naik nimbalkar
Ajit Pawar Beed Sabha : धनुभाऊ, बीडमध्ये तुम्ही लावलेल्या दिव्याचा उजेड पडला नाही; मात्र आम्हाला चटके बसले : क्षीरसागरांची खंत

वास्तविक, शिंदे आणि मोहिते पाटील यांच्यात संघर्ष आहे, त्यामुळे शिंदेंनी मोहिते पाटील यांचा विरोधक या नात्याने निंबाळकरांना पाठिंबा दिला आहे. निंबाळकर आणि मोहिते पाटील यांचेही एकमेकांशी जमत नाही. त्यातच आमदार संजय शिंदे आणि निंबाळकर यांची खासदार होण्यापूर्वीपासून दोस्ती आहे. त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीनंतर दूर झालेल्या शिंदे आणि निंबाळकर यांच्या पुन्हा दोस्ताना झाला आहे.

Sanjay Shinde-Ranjitsinh Naik nimbalkar
NCP Corporators Join Prahar : वाशिममध्ये राष्ट्रवादीला खिंडार; नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांचा बच्चू कडूंच्या प्रहारमध्ये प्रवेश

खासदार निंबाळकर यांना पाठिंबा देताना आमदार संजय शिंदे यांनी म्हटले आहे की, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी कामे केली असून विकास केला आहे. गतवेळच्या प्रतिस्पर्ध्याला पाठिंबा देत अधिक मताधिक्याने निवडून आणण्याचे शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com