पंढरपूर : पवार चुलत्या पुतण्यांनी राजकीयदृष्ट्या मला २० वर्षे घरात कोंडून ठेवले, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांनी केला आहे. दसरा मेळाव्यानंतर आमदार पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवारांवर (Sharad Pawar) तोफ डागली आहे. (MLA Shahaji Patil's allegations against Sharad Pawar and Ajit Pawar)
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथील धाराशिव साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा प्रारंभ आज (ता. ८ ऑक्टोबर) आमदार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या वेळी बोलताना त्यांनी पवार यांच्यावर निशाना साधला. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार दीपक साळुंखे यांनी आमदार शहाजी पाटील यांना यापुढे जपून बोलावे. शक्यतो शरद पवारांवर टीका न करण्याचे आवाहन केले.
आमदार शहाजी पाटील म्हणाले की, माझा जन्मच चुलीजवळ झाला आहे. त्यामुळे मला विस्तवाशी खेळण्याचा मोह आवरत नाही, असे म्हणत त्यांनी थेट शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांवर पुन्हा तोफ डागली. पंढरपूर येथील विठ्ठल कारखान्यावर शरद पवार आले होते. त्यावेळी शरद पवार यांच्या पायापुढे चपल्या काढून ठेवायचो अशी मिस्किल टिप्पणी करत, पवार काका पुतण्याने राजकारणात २० वर्ष मला कोंडून ठेवलं. यांचे साक्षीदार माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आहेत. राजकारणात पवारांनी माझे एकप्रकारे राजकीयदृष्ट्या खच्चीकरण केल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला.
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार दीपक साळुंखे यांनी विधानसभा निवडणुकीत शेकाप उमेदवाराच्या विरोधात जाऊन आमदार शहाजी पाटील यांना मदत केली होती. त्यामुळे साळुंखे यांनी आमदार पाटील यांना शरद पवार यांच्यावर टीका न करण्याचे आज आवाहन केले. तरीही आमदार पाटील यांनी आपल्या माणदेशी शैलीमध्ये पवारांचा समाचार घेतला. नंतर मात्र आमदार पाटील यांनी सारवासारव करत शरद पवार माझे दैवत आहेत, यापुढे त्यांच्या विषयी बोलणार नाही, अशी स्पष्टोक्ती केली.
या वेळी विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, उपाध्यक्ष प्रेमलता रोंगे, संचालक धनंजय काळे, दिनकर चव्हाण, हणमंत पाटील आदी उपस्थित होते. सांगोला कारखान्याच्या उस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीसाठी अभिजीत पाटील यांनी दोनशे रूपयांचा हप्ता या वेळी जाहीर केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.