Assembly Session : टोलनाक्यावरील गुंडगिरीवरुन शिवेंद्रसिंहराजे आक्रमक; त्यांचा रोख नेमका कोणाकडे...?

Shivendraraje Bhosale आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टोलनाक्यावरील वसुलीच्या संदर्भात शुक्रवारी विधानसभेत अभ्यासपूर्ण मांडणी केली.
MLA Shivendraraje Bhosale
MLA Shivendraraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

Shivendraraje Bhosale in Session : टोलनाक्यावरील गुंडगिरीवरुन सातारा, जावळीचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज अधिवेशनात आक्रमक भुमिका घेतली. कंपन्यांच्या नावावर टोलनाका घेऊन गुंडांच्या माध्यमातून टोल वसुली केली जात असल्याचे निदर्शनास आणून देत पोलिस रेकॉर्डवरील अनेकजण टोल नाक्यावर कार्यरत असतात. त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आळा बसावा, अशी जोरदार मागणी त्यांनी सभागृहात केली.

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून आज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांनी टोलनाक्यावरील Toll plaza वसुलीच्या संदर्भात सभागृहात आक्रमक भूमिका घेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाईची मागणी केली. ते म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोलनाक्यांवर कोणत्याही सुविधा प्रवाशांना दिल्या जात नाहीत.

गर्दीच्या वेळेस वाहनांसाठी टोलनाका व्यवस्थापन त्यांच्या हितासाठी एक वेगळी लेन ठेवतात. त्या लेनच्या माध्यमातून मिळणारा पैसा हा रेकॉर्डवर येत नाही. त्यामुळे एनएचएआयचे रस्ते आहेत हे म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेचा पैसा लुटला जात आहे, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

टोलनाका परिसरातील ठराविक अंतरातील स्थानिकांना टोल माफी दिली गेली आहे. परंतु त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर केली जात नाही. सातारा जिल्ह्यातील तासवडे, आनेवाडी, तसेच पुणे जिल्ह्यातील खेड शिवापुर टोल नाका येथे स्थानिकांना टोलमाफी दिली जात नाही.

MLA Shivendraraje Bhosale
भिंतीवरील चित्र ते खासदारकीचा पराभव, Shivendra Raje यांनी Uddayna Raje यांना डिवचलं | BJP | Satara

या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी टोलनाक्यावर किती पैसे गोळा केले जातात, याची माहिती पटलावर ठेवली जाईल. तसेच गुन्हे दाखल असलेल्या लोकांवर त्या त्या वेळी पोलिसी कारवाई होत असते, असेही चव्हाण यांनी सांगितले.

Edited by : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com