Raju Patil : जरांगेंनी वेळ दिला होता, तेव्हा झोपा काढल्या का? राजू पाटलांनी सरकारला विचारला जाब

Raju Patil on Maratha Reservation : पण हे प्रकार होतात का ? अस सवाल आमदार राजू पाटील यांनी उपस्थित होते
Raju Patil News
Raju Patil News Sarkarnama
Published on
Updated on

Dombivali News : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. जरांगेंना दिलेल्या शब्द सरकारने पाळला नाही, सरकारच्या भूमिकेवरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. जरांगेंचा उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे.

"मराठा आरक्षण या विषयावर मनसे प्रमुख राज ठाकरे हे मागेही बोलले होते, की सर्वांची इच्छा आहे तर आरक्षण का देत नाहीत. जरांगे पाटील यांना आश्वासन दिलेलं काही दिवसांत आरक्षण दिले जाईल, त्यांनी तो वेळ दिला होता. त्यावेळेस यांनी का झोपा काढल्या. आता टोकाशी आल्यावर त्यांना सांगतात उपोषणाला बसू नका. दोन पावलं मागे घ्या अजून वेळ द्या. पण हे प्रकार होतात का ? अस सवाल आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला.

हे फक्त तोंडाला पानं पुसायचं...

"आज दिल्लीला गेलेत तेव्हा जायचं होतं उपोषण सोडल्याबरोबर. मात्र, हे कुठेतरी कमी पडतात. जातीपातीत भांडण लावून राजकारणाचा जो पोरखेळ सुरू आहे. राजकारणाचा जो फिस्का झालेला आहे याच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व काही करत आहेत. आरक्षण हे टिकणार द्यावं लागेल. त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील.

जातीनिहाय त्याची जनगणना करावी लागेल अनेक गोष्टी आहेत. याच्यासाठी कोणी पुढाकार घेतला नाही, त्यामुळे हे फक्त तोंडाला पानं पुसायचं चालू आहे," अशा शब्दांत आमदार पाटलांनी सरकारवर टीका केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात आज (गुरुवार) पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे समजते . या प्रकरणी तीन जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर सदावर्तेंनी टीका केली होती. त्यावरून ही तोडफोड केल्याची चर्चा आहे. सदावर्ते यांच्या गाड्यांच्या तोडफोड करणाऱ्या व्यक्ती 'एक मराठा लाख मराठा'अशा घोषणा देत होत्या.

Raju Patil News
PM Modi in Shirdi : विखेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक; मोदींच्या दौऱ्यासाठी आलेल्या बस गाड्या पाठवल्या परत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com