PM Modi in Shirdi : विखेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक; मोदींच्या दौऱ्यासाठी आलेल्या बस गाड्या पाठवल्या परत

Maratha Reservation News : विखे कुटुंबीयांच्या विरोधात शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी येथील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे.
PM Modi Visit Shirdi
PM Modi Visit Shirdi Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्याचा फटका मोदींच्या दौऱ्याला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, मोदींच्या दौऱ्यासाठी नागरिकांना घेण्यासाठी आलेल्या बस गावकऱ्यांनी परत पाठवल्या आहेत.

मोदींच्या दौऱ्यासाठी नागरिकांना नेण्यासाठी खासदार सुजय विखेंनी बस गाड्या पाठवल्या होत्या, असे समजते. विखे कुटुंबीयांच्या विरोधात शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी येथील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. या गावात पुढाऱ्यांना येण्यासाठी गावकऱ्यांनी बंदी घातली आहे.

PM Modi Visit Shirdi
Jayant Patil : मोदींजी, तुम्ही खुशाल श्रेय घ्या ! जयंत पाटलांचा टोला; 'निळवंडे'च्या कामाची करून दिली आठवण

मोदींच्या हस्ते आज अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि अकोले येथे विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याची तयारी पूर्ण झाली आहे. शिर्डीमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यानंतर शिर्डीजवळील काकडी गावात पंतप्रधान मोदींची जाहीर सभा होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाच वर्षांनी साईबाबांचे दर्शन

मोदी तिसऱ्यांदा साईबाबांच्या चरणी नतमस्तक होणार आहे. पाच वर्षांनी ते साईबाबांचे दर्शन घेणार आहेत. वातानुकूलित दर्शन रांगेचं लोकार्पण मोदींच्या हस्ते होत आहे. मोदी दुपारी एक वाजता शिर्डीत दाखल होणार असून, साईबाबा समाधी मंदिराचं ते दर्शन घेऊन पूजा करणार आहेत.

दुपारी दोन वाजता निळवंडे धरणाचं जलपूजन त्त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर विविध प्रकल्पांची पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनानंतर पंतप्रधान सायंकाळी 6.30 वाजता गोव्याकडे रवाना होतील.

PM Modi Visit Shirdi
Attack on Gunaratna Sadavarte Vehicle : "जरांगे, हेच का शांतताप्रिय आंदोलन? गाड्यांच्या तोडफोडीनंतर सदावर्ते आक्रमक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com