मोनिका राजळे म्हणाल्या, सध्या काहींना निवडणुका जवळ आल्याने डोहाळे लागलेत...

भाजपच्या ( BJP ) शांत व अभ्यासू असणाऱ्या आमदार मोनिका राजळे ( MLA Monika Rajale ) यांनी नेहमीची शैली काहीशी बाजूला सारत आक्रमकपणे विरोधकांवर टीका केली.
monika rajale
monika rajaleSarkarnama
Published on
Updated on

सतीश सुपेकर

बोधेगाव ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यात विधानपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण तापू लागले आहे. भाजपच्या शांत व अभ्यासू असणाऱ्या आमदार मोनिका राजळे यांनी नेहमीची शैली काहीशी बाजूला सारत आक्रमकपणे विरोधकांवर आज टीका केली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी नाव न घेता शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले यांच्यावर टीका केली. Monika Rajale said, "Some people are worried now that the election is approaching ..."

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे आमदार मोनिका राजळे यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा नियोजन अंतर्गत मंजूर बोधेगाव ते एकबुरूजी वस्ती रस्ता या 35 लाख रुपये खर्चाचे काम मंजूर झाले आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा आज आमदार राजळे यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी शिवाजी पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे, तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, आशा गरड, सरपंच सुभाष पवळे, सेवा संस्थेचे अध्यक्ष मनोहर घोरतळे, कासमभाई शेख, सचिन वारकड, सुनिलसिंह राजपूत, मयुर हुंडेकरी, विश्वनाथ घोरतळे, विश्वनाथ कुढेकर, ज्ञानदेव घोरतळे, दादा काशिद, अशोक बानाईत, संजय काशिद, नवनाथ भवार, अशोक गाढे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

monika rajale
मोनिका राजळे म्हणाल्या, विरोधकांच्या टिकेची पर्वा नाही...

या प्रसंगी आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, राज्यातील सरकार आपले नसल्याने विकासकामे करताना अडचणी येतात. तरीही जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. सध्या काहींना निवडणुका जवळ आल्याने डोहाळे लागलेत. ज्याने त्याने आपल्या आवाक्यानुसारच पाठपुरावा करावा. राज्य शासनाचे विषय मांडायला आमदार, खासदार आहेत. नको त्या कामांचे श्रेय घेण्यासाठी सर्वसामान्यांच्या डोळ्यात धुळफेक करू नये, असा टोला आमदार मोनिका राजळे यांनी विरोधकांना लगावला.

monika rajale
विरोधकांचा निधी वळविला जातोय ! आमदार मोनिका राजळे यांची सरकारवर टीका

भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे म्हणाले, राज्यातील तिघाडी सरकार दळभद्री असून त्यांना शेतकरी, कामगार, व्यापारी व सर्वसामान्य जनतेचे काहीही देणेघेणे नाही. तालुक्यात काहीजण चिल्लर पोरांसारखे धंदे करून नको त्याचे श्रेय बातम्यांमधून मिरवत असल्याची टिका, सभापती डॉ. क्षितिज घुले यांचे नाव न घेता केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com