Pahalgam Terror Attack : अमोल कोल्हेंनी थेट सुनावलं, '...तर आपण अतिरेक्यांच्या भूमिकेला खतपाणी घालत नाही ना?'

Amol kolhe On Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ला अत्यंत दुर्दैवी होता. या हल्ल्याच्या मागे पाकिस्तान असल्याचे आता स्पष्ट झालं आहे.
Amol Kolhe
Amol KolheSarkarnama
Published on
Updated on

Dr. Amol Kolhe News : पहलगाम दहशतवादी हल्ला अत्यंत दुर्दैवी होता. या हल्ल्याच्या मागे पाकिस्तान आहे हे स्पष्ट आहे. पाकिस्तानला केंद्र सरकार योग्य तो धडा शिकवेल आता अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी भाष्य करताना कठोर शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

कोल्हे यांचे आजपासून छत्रपती संभाजी महाराज हे महानाट्य शहरात सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत वक्तव्य करताना एक शंकाही व्यक्त केली. ते म्हणाले, दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घालताना ते कोणत्या धर्माचे आहेत? असा प्रश्न केल्याचे मी प्रत्यक्षदर्शींच्या व्हिडिओतून पाहिले. त्यामुळे दहशतवाद्यांनी हा प्रश्न जाणीवपूर्वक तर विचारला नाही ना? अशी शंका येत असल्याचे म्हटलं आहे

आज पाकिस्तानची अंतर्गत दुरावस्था, आर्थिक संकट, त्यांच्या सैन्याची अवस्था आणि सीमेवर तयार झालेली वातावरण या सगळ्यांचा विचार केला पाहिजे. हा विचार केला तर पाकिस्तानने हे जाणीवपूर्वक योजले की काय अशी शंका येते. त्यामुळे अशा स्थितीत सर्व भारतीयांनी कोणताही किंतू परंतु न ठेवता एक झाले पाहिजे असेही कोल्हे यांनी आवाहन केलं आहे.

Amol Kolhe
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू..., वेळ अन् ठिकाण तुम्हीच निवडा, PM मोदींचा तिन्ही सैन्य दलांना 'फ्री हॅन्ड'

आज देशातील सर्व पक्ष, नेते आणि जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आपली आजची स्थिती राष्ट्र प्रथम म्हणून सर्वजण केंद्र शासनामागे खंबीरपणे उभे आहेत. सैन्य दलाच्या मागे सर्व राष्ट्र म्हणून उभे राहणार आहेत. सीमेवर सैन्य लढेल तेव्हा ते एक राष्ट्र म्हणून लढणार आहे. याच भावनेतून आपण सर्वांनी उभे राहण्याची गरज आहे.

पाकिस्तानचा काय बिमोड करायचा तो सरकार करेलच. पण त्यांच्या नांग्या ठेचायच्या आहेत त्या एकदा ठेचल्या गेल्याच पाहिजे. हीच प्रत्येकाची भावना आहे. अशा स्थितीत जेव्हा राष्ट्र लढते तेव्हा त्यात कोणताही गृहकलह असू नये. सगळ्यांनी एकसंघपणे राहिले पाहिजे.

Amol Kolhe
Pahalgam Terror Attack : पहलगामनंतर पुन्हा हल्ल्याची भीती; अखेर जम्मू-काश्मीर सरकारने घेतला मोठा निर्णय

दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या. यावर माध्यमातून मोठी चर्चा घडवली जात आहेत. शिष्ट वर्ग धर्मा धर्मातून विभाजनाचा आणि बहिष्काराचा संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे समाजात दुहीची बीजे आणि राजकारण होत असल्याचे चित्र आहे. कदाचित पाकिस्तानला हेच हवे असेल. त्यामुळे अजाणते पणे आपण त्यांच्या भूमिकेला खतपाणी घालत तर नाही ना याचा विचार आवश्यक आहे. याबाबत खासदार कोल्हे यांनी सडेतोड शब्दात आपली भूमिका मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com