खासदार निंबाळकर, खोत आणि गोरे भेटले पंतप्रधान मोदींना!

महाराष्ट्रातील या तीन नेत्यांनी बुधवारी मोदींची भेट घेत अर्थसंकल्पातील विविध योजना व तरतुंदीबाबत त्यांचे आभार मानले.
Ranjeetsingh Naik Nimbalkar, Sadabhau Khot and Jaykumar Gore with PM Narendra Modi.
Ranjeetsingh Naik Nimbalkar, Sadabhau Khot and Jaykumar Gore with PM Narendra Modi.Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनादरम्यान (Parliament Session) देशभरातील अनेक खासदार, नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) भेटीसाठी उत्सुक असतात. त्यांच्याकडे राज्यातील विविध प्रश्न, समस्या पोहचविण्यासाठी जणू रांग लागलेली असते. त्यात महाराष्ट्रातील खासदार, नेतेही मागे नसतात. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान (Budget Session) माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar), माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आणि माण खटावचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनीही पंतप्रधान मोदींनी संसद भवनात भेट घेतली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील या तीन नेत्यांनी बुधवारी मोदींची भेट घेत अर्थसंकल्पातील विविध योजना व तरतुंदीबाबत त्यांचे आभार मानले. शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करणे, बजेट फार्मिंग योजना कार्यान्वित करणे, पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची व्यवस्था करणे, शेतमाल अधिक वेगाने बाजारपेठेत पोचवण्यासाठी रेल्वेचे जाळे, शेतीमध्ये आधुनिकीकरण करण्यासाठी कृषी महाविद्यालय स्थापण करणे, स्टार्टअप योजनेअंतर्गत नाबार्डच्या माध्यमातून कर्जपुरवठा करणे, असे निर्णय घेतल्याबद्दल खोत यांनी आभार मानले. (Union Budget 2022)

Ranjeetsingh Naik Nimbalkar, Sadabhau Khot and Jaykumar Gore with PM Narendra Modi.
जिल्हाधिकारी नार्वेकरांनी एक-दोन नव्हे तर चौदा मुद्दे मांडत सिध्द केला वानखेडेंचा ‘फ्रॉड’

साखर कारखान्यांवर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशनने आकारलेला प्राप्तिकर रद्द करण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला आहे. या निर्णयाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तसेच साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबद्दलही खोत यांच्यासह रणजितसिंह नाईक निंबाळकर व जयकुमार गोरे यांनी आभार मानले. केंद्रतील सरकार निश्चितपणे शेतकऱ्यांना प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशिल राहिल, असं आश्वासन मोदींनी यावेळी दिल्याचे नेत्यांनी सांगितले. तीन कृषी कायदे मागे घेतले असले तरी देशातील शेतकऱ्यांना शेतमाल खरेदी विक्रीसाठी सर्व स्तरावर मदत केली जाईल, असा विश्वास भेटीदरम्यान मोदींनी व्यक्त केला.

यावेळी जिहे- कठापूर योजनेच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आणि या योजनेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहणार असल्याचे मत व्यक्त केले. या योजनेला आर्थिक बजेटमध्ये तरतूद करून देण्यात येईल, असं आश्वासन दिल्याचे गोरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com