Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkarsarkarnama

रणजितसिंह निंबाळकरांनी दिले थेट रामराजेंनाच आव्हान; हिंमत असेल तर...

भाजप BJP तर सोडाच राष्ट्रवादी NCP सुद्धा आता तिकीट देईल का नाही, याची शंका आहे. कारण यांच्यावर आता कुणाचा विश्वास राहिला नाही, असेही रणजितसिंह निंबाळकर Ranjitsinh Naik Nimbalkar यांनी स्पष्ट केले.

सातारा : ''हिंम्मत असेल तर रामराजेंनी माझ्या विरोधात लोकसभेला किंवा गोरेंच्या विरोधात विधानसभेला उभे राहुन दाखवावे. बघू किस मे कितना है दम,'' असे म्हणत माढाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांना थेट आव्हान दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरावड्याचं आयोजन करण्यात आलय या निमित्ताने फलटण शहरात संवाद मेळाव्याचं आयोजन भाजपाच्या वतीने करण्यात आलं होतं. यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि भाजपा चे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे हे उपस्थित होते.

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
रणजितसिंह निंबाळकरांचे प्रयत्न; माण, खटावच्या १८१ गावात मिळणार नळाद्वारे पाणी...

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तुफान फटकेबाजी करत रामराजेंवर जोरदार हल्ला चढवला हिंम्मत असेल तर माझ्या विरोधात लोकसभेला किंवा गोरेंच्या विरोधात विधान सभेला उभं राहुन दाखवा; बघू "किस मे कितना है दम" असे थेट आव्हान त्यांनी रामराजेंना दिले.

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
रामराजे देशाच्या राजकारणात सक्रिय होणार; राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय समितीवर निवड

तसेच आता मला भाजपमध्ये घ्या, म्हणून रामराजे मागे लागले आहेत, असा गौप्यस्फोटही रणजितसिंह निंबाळकर त्यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या मागे तडजोड करू, असे ते सांगत आहेत. सत्तेतून बाहेर पडल्याने मासा जसा तडफड करतो तशी त्यांची आता तडफड होत आहे. पण आता यांना भाजप तर सोडाच राष्ट्रवादी सुद्धा आता तिकीट देईल का नाही, याची शंका आहे. कारण यांच्यावर आता कुणाचा विश्वास राहिला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com