Udayanraje Bhosale News : निकालाआधीच उदयनराजे 'अ‍ॅक्टिव्ह मोड'वर; राज्यपालांची घेतली भेट,'हे' आहे कारण

Satara Latest News : खासदार उदयनराजे भोसले यांनी आज महाबळेश्वर मुक्कामी असलेले राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली. राज्यपालांची भेट घेण्यामागे काय आहे कारण
Udayanraje Bhosale
Udayanraje BhosaleSarkarnama

Satara Latest News : खासदार उदयनराजे भोसले यांनी आज महाबळेश्वर मुक्कामी असलेले राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी सुमारे अर्धा तास त्यांनी राज्यातील विविध विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये नमामी कृष्णा, गडकिल्ल्यांचे संवर्धन, मराठ्यांच्या राजधान्यांचा सुचीबद्ध विकास आणि छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या अधिकृत इतिहास केंद्र सरकारने प्रसिद्ध करावा, आदी मागण्या त्यांनी निवेदना व्दारे केल्या. त्यावर राज्य सरकार सकारात्मक पावले उचलेल अशी ग्वाही दिली.

यावेळी उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांना विविध विकासांच्या मुद्द्यावरील निवेदन दिले. तसेच विविध विषयांवर विस्तृत चर्चा केली. यामध्ये क्षेत्र महाबळेश्वरमध्ये उगम पावून सातारा- सांगली (Sangli) जिल्ह्यातून पुढे कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश येथे बंगालच्या सागराला मिळणा-या कृष्णा नदीचे सुशोभिकरण आणि शुध्दीकरण करण्यासाठी ‘नमामी गंगा’ योजनेच्या धर्तीवर ‘नमामी कृष्णा’ योजना महाराष्ट्रासह इतर राज्यात राबवणे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Udayanraje Bhosale
Vishal Patil News : काँग्रेसच्या जेवणाला विशाल पाटलांची एन्ट्री, ठाकरे गट खवळला; "गल्ली ते दिल्ली..."

बौध्द सर्किट किंवा रामायण सर्किटप्रमाणे शिवस्वराज्य सर्किट योजना मार्गी लावणे. यातून छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास अधिकाधिक वृध्दींगत करण्याकरीता तसेच मराठा साम्राज्याच्या पाऊलखुणा जपण्यासाठी राजगड, रायगड आणि सातारा या तीन राजधान्यांचा समयसुचीबध्द विकास करणे. पानीपत ते तंजावर मधील ऐतिहासिक स्थळांचा आणि परिसराचा सुयोग्य विकास साधावा. जेणेकरुन मराठा साम्राज्याच्या समृध्द इतिहास परंपरेचे अवलोकन करण्यासाठी जगभरातून इतिहासप्रेमी याठिकाणी भेट देतील.

तसेच पर्यटनाला देखील अधिक चालना मिळेल. किल्ले प्रतापगडसह राज्यातील गडकिल्यांचे संवर्धन योजना आखणे. महाबळेश्वर-पाचगणीच्या विकासासाठी उच्यस्तरीय संनियंत्रण समितीवर, संसद- विधीमंडळ प्रतिनिधींसह, स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून महाबळेश्वर आणि पाचगणीच्या नगराध्यक्षांची नियुक्ती करावी. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज यांचा अधिकृत इतिहास भारत सरकारव्दारे प्रसिध्द करण्यासाठी राज्य सरकाने पावले टाकावीत, या विषयांवर चर्चा झाली. राज्यपाल रमेश बैस यांनी उदयनराजे भोसले यांचे मुद्दे समजून घेऊन याविषयी राज्य शासन निश्चितपणे सकारात्मक कार्यवाही करेल, असे नमुद केले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले (Udaynraje Bhosale) यांच्या समवेत खाजगी सचिव जितेंद्र खानविलकर, गणेश भोसले, ॲड. विनित पाटील, प्रीतम कळसकर उपस्थित होते.

Udayanraje Bhosale
Satej Patil News : पी. एन. पाटील यांच्या जाण्यानं सतेज पाटील भावुक, आठवणींना दिला उजाळा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com