Ahmednagar : व्यापाऱ्यावरील हल्ल्याच्या घटनेनंतर खासदार विखे अ‍ॅक्शन मोडवर; अनाधिकृत टपऱ्या जेसीबी लावून काढणार

Ahmednagar city : अहमदनगरमध्ये वातावरण तापलं : व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर व्यापाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
MP Sujay Vikhe patil
MP Sujay Vikhe patil Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील कापड बाजारात शुक्रवारी दोन व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ आज नगर शहरात बंद पाळून व्यापाऱ्यांनी निषेध व्यक्त करत ठिय्या आंदोलन केलं. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलीस प्रशासनाकडून मोठा फौज फाटा या परिसरात तैनात करण्यात आला आहे.

नगर शहरातील व्यापाऱ्यांवरील जीवघेणा हल्ला झाल्याच्या घटनेची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून या घटनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अवगत करण्यात आलं आहे, अशी माहिती खासदार सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

MP Sujay Vikhe patil
Ahmednagar News : अहमदनगर शहरात वातावरण तापलं; हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचा ठिय्या

खासदार विखे यांनी व्यापाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी बोलताना विखे म्हणाले, ''काल (शुक्रवारी) ज्या पद्धतीने समाज कंटकांनी प्राणघातक हल्ला केला. आता हे सर्व सहनशिलतेच्या पलिकडे गेलं आहे. पण मी तुम्हाला विश्वास देतो की, ज्या पद्धतीने कारवाई पुढच्या दहा दिवसांमध्ये होणार आहे. ही कारवाई कुणीही आलं तरी थांबणार नाही. कुणाच्याही सांगण्याने ही कारवाई थांबणार नाही. मी खासदार आहे त्यामुळे माझी ही जबाबदारी आहे'', असं ते म्हणाले.

''गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार पोलीस प्रशासनाने जर पुढील दहा दिवसांमध्ये कुठलीही दिरंगाई केली तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल. यावर आता परमनंट उपाय काढला जाईल. सर्व व्यापाऱ्यांच्या सुरक्षतेची जबाबदारी आमची आहे. पोलीस प्रशासन कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. या प्रकरणामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप स्वीकारणार नाही'', असं आश्वासन विखे त्यांनी व्यापाऱ्यांना दिलं.

MP Sujay Vikhe patil
Bhavana Gawali : भावनाताईंचे देऊळ पाण्यात? भूतकाळातील वाद अन् ठाकरेंची सोडलेली साथ भोवणार...? बंजारा कार्डवर ठरणार गेम…

एका कार्यक्रमात बोलताना खासदार सुजय विखे यांनी कापड बाजार परिसरातील अनाधिकृत टपऱ्यांबाबत कारवाईचा इशारा दिला. ''लोकं जर प्रतिष्ठित व्यापाऱ्याला दिवसाढवळ्या चाकू दाखवायला घाबरत नसतील तर पुढील 10 दिवसात यावर कारवाई होईल. जेवढे लोकं अनाधिकृत टपऱ्या लावून बसले आहेत, ते सगळे अतिक्रमण आम्ही जेसीबी लावून काढणार'', असा इशारा त्यांनी दिला.

नेमकं घटना काय?

नगर शहरातील कापड बाजारामध्ये शुक्रवारी सायंकाळी दीपक नवलानी या व्यापाऱ्यांशी काही जणांनी हुज्जत घालत त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये नवलानी गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. तर या घटनेच्या निषेधार्थ आज अहमदनगर शहरात बंद पाळून व्यापाऱ्यांनी निषेध व्यक्त करत ठिय्या आंदोलन केलं. तसेच या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com