Hasan Mushrif On Satej Patil : मुश्रीफांचा सतेज पाटलांना कडक इशारा; म्हणाले, 'मैत्री मैत्रीच्या ठिकाणी अन् राजकारण...

Kolhapur Politics : पालकमंत्री बनल्यानंतर मुश्रीफ अॅक्शन मोडवर...
Hasan Mushrif On Satej Patil
Hasan Mushrif On Satej Patil Sarkarnama
Published on
Updated on

राहुल गडकर -

Kolhapur News : एकेकाळी काँग्रेस नते आमदार सतेज पाटील आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या मैत्रीचा फायदा देत जिल्ह्याच्या राजकारणात आघाडी मिळवून दिली होती. पण तेच मित्र आता आगामी निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांच्या विरोधात ठाकणार आहेत. दोन नेत्यांमध्येच आता राजकीय संघर्ष उफाळून येणार आहे. तसे संकेत मंत्री मुश्रीफ यांनी दिले आहेत. काल झालेल्या पत्रकार परिषदेत त्याबाबत त्यांनी वक्तव्य केले आहे. यामुळे आता कोल्हापुरात नव्या राजकीय नाट्याचा नवा अंक दिसून येणार आहे. (Latest Marathi News)

मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले की, "मैत्री मैत्रीच्या ठिकाणी आणि राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असते. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ कुणासोबत आहेत हे सर्वांना लक्षात येईल. सहकार आणि इतर संस्थांचा विषय असेल, तर या ठिकाणी सतेज पाटील आणि आम्ही एकत्र आहोत. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला लक्षात येईल, मी कुणाबरोबर आहे, असे विधान करून मंत्री मुश्रीफ यांनी आतापासूनच आमदार सतेज पाटलांच्या विरोधात दंड थोपटण्याच्या तयारीत असल्याचे दाखवून दिले.

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावरून पालकमंत्री मुश्रीफ यांनी कर्नाटक सरकारला थेट इशारा दिला आहे. धरणाची उंची वाढवल्यास सर्वात जास्त फटका कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाडला बसतो. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना भेटून परिस्थिती सांगितली पाहिजे. जर कर्नाटक सरकारने आमची मागणी मान्य नाही केली, तर आंदोलन करावे लागेल, असा इशारा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com