Ahmednagar Politics : सरपंच लईच भारी, राज्याच्या महसूलमंत्र्यांना दिला झटका

Muthewadgaon Village Sarpanch vs Murkute-Vikhe Patil Group : एका सरपंचाने नगरमधील बड्या प्रस्थापितांना दिला धक्का...
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

Muthewadgaon Shrirampur Ahmednagar News :

ग्रामपंचयात निवडणुकीत जनतेतून निवडून दिलेल्या सरपंचांना गाव गुंडांसह राजकीय नेत्यांच्या गटा-तटाच्या राजकारणाला समोरे जावे लागत आहे. श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगावचे सरपंच सागर मुठे यांनी विखे-मुरकुटे गटाने केलेल्या कुरघोडीवर मात करत चपराक दिली आहे. या राजकीय खेळीची गावसह श्रीरामपूर तालुक्यात चर्चा रंगलीय.

मुठेगावचे सरपंच सागर मुठे यांच्या विरोधात विखे-मुरकुटे गटाच्या सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी 12 जानेवारीला तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता. या अर्जातून गुरूवारी (ता. 18 ) विशेष सभा आयोजन केले होते. परंतु सरपंच मुठे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत या विशेष सभेला स्थगिती घेतली. सरपंच मुठे यांनी ही न्यायालयीन खेळी लय भारी ठरल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.

Radhakrishna Vikhe Patil
Political News : नगर जिल्ह्यातील बेलापूर गावाचा मोठा निर्णय; श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी...

मुठेवाडगाव ग्रामपंचायतीमध्ये 9 सदस्य संख्या असून काॅंग्रेस आमदार लहु कानडे गटाचे सरपंच सागर मुठे यांच्याकडे पाच तर, विखे-मुरकुटे गटाकडे चार, असे संख्याबळ आहे. सरकारी जागेवर अतिक्रमण या विरोधकांच्या तक्रारीवरून सत्ताधारी गटाचे दोन सदस्य अपात्र झाले आहेत. पोटनिवडणुकीत या दोन्ही जागा विखे-मुरकुटे गटाकडे गेल्याने सदस्य संख्या सहावर गेली. सत्ताधारी सरपंच सागर मुठे यांच्याकडे तीनच सदस्य राहिले. त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी विखे-मुरकुटे गटास एका सदस्याची गरज होती.

उपसरपंच विजया भोंडगे यांच्याविरूद्ध सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. याच दरम्यान सत्ताधारी गटानेही विरोधी गटाच्या सदस्या लंका दिनकर मुठे यांच्याविरूद्ध अतिक्रमण केल्याची तक्रार दाखल केली. जिल्हाधिकारी यांनी दोन्ही सदस्यांना अपात्र ठरविले. जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाविरूद्ध दोन्ही गटाने नाशिक अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे धाव घेतली. अतिरिक्त आयुक्तांनी विखे-मुरकुटे गटाच्या सदस्या लंका दिनकर मुठे यांच्या निकालास स्थगिती तर, सत्ताधारी गटाच्या उपसरपंच विजया भोंडगे यांचा निकाल कायम ठेवला. पर्यायाने त्या अपात्र ठरल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

या निर्णयामुळे विखे-मुरकुटे गटाची सदस्य संख्या सहा तर, सत्ताधारी गटाकडे सरपंचपद धरून फक्त दोनच जागा राहिल्या. अविश्वास ठरावाचा मार्ग सुकर झाल्याने 12 जानेवारीला सहा सदस्यांनी अविश्वासासाठी तक्रारी अर्ज दाखल केला. त्यानुसार तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी गुरूवारी (ता. 18) विशेष सभा बोलावली. सत्ताधारी गटाचे सरपंच यांनी या निर्णय विरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. 20 जानेवारीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकारी यांनी दोन्ही महिला सदस्यांना सारखाच निकाल दिलेला असताना अतिरिक्त आयुक्त नाशिक यांच्यावर ताशेरे ओढून उपसरपंच विजया भोंडगे यांच्या निकालास स्थगिती दिली. यामुळे तहसीलदार यांनी पुढील विशेष सभा प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिले आहेत. ३० जानेवारीला प्रतिवादी पक्षास हजर राहून आपले म्हणणे मांडण्याचे न्यायालयाने आदेश दिला आहेत. सत्ताधारी गटाच्यावतीने अॅड. अरूण जंजिरे, अँड मनोज दौंड यांनी काम पाहिले.

edited by sachin fulpagare

Radhakrishna Vikhe Patil
NCP Politics : राष्ट्रवादीचेही खळ्ळखट्याक; तक्रारी बेदखल केल्याने कार्यालय फोडले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com