NCP Politics : राष्ट्रवादीचेही खळ्ळखट्याक; तक्रारी बेदखल केल्याने कार्यालय फोडले

MNS Style attack : निकृष्ट कामाचे पुरावे देऊनही कारवाई केल्याने पदाधिकाऱ्याचा रुद्रावतार...
Prakash Pote, NCP Politics
Prakash Pote, NCP PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Nagar Political News :

'खळ्ळखट्याक' हा शब्द मनसेशी जास्त जोडला गेलेला आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही याला आपलासा करण्याचे ठरवले आहे. म्हणूनच नगरमध्ये राष्ट्रवादी काँगेसचे (शरद पवार गट) युवक शहराध्यक्ष प्रकाश पोटे यांनी दांडक्याचा वापर करीत खळ्ळखट्याकची प्रचीती दिली.

जलजीवन पाणीपुरवठा वाहिनीचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप करीत याची चौकशी करा, अशी मागणी प्रकाश पोटे यांनी केली. या मागणीसाठी ते इतके आक्रमक झाले, की त्यांनी थेट जिल्हा परिषदेमधील ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि जलजीवन योजना कार्यालयात घुसून तोडफोड केली.

Prakash Pote, NCP Politics
NCP News : अजितदादांच्या राष्ट्रवादीत उमेश पाटलांना बढती...

नगर (Ahmednagar) तालुक्यात सुरू असलेल्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) युवक शहराध्यक्ष (NCP) प्रकाश पोटे केली होती. या निकृष्ट कामाचे पुरावेदेखील त्यांनी दिले होते. एवढेच नाही तर तक्रारीचा पाठपुरावादेखील ते करत होते. पण अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासन मिळत होते, कार्यवाही होत नव्हती.

प्रकाश पोटे कार्यालयात येताच अधिकारी त्यांना टाळायचे. आजही तसेच झाले. प्रकाश पोटे हे तक्रारीचा पाठपुरावा करीत होते. यासाठी ते अधिकाऱ्यांना संपर्क करीत होते. परंतु अधिकाऱ्यांनी त्यांचा फोन उचलला नाही. सात ते आठवेळा फोन करूनही अधिकाऱ्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अखेर संतप्त झालेले पोटे हातात दंडुका घेऊनच कार्यालयात शिरले आणि कार्यालयातील काचा फोडल्या. याशिवाय अधिकाऱ्यांच्या दालनाचीदेखील तोडफोड केली. प्रकाश पोटे यांचा आक्रमक अवतार पाहताच काही अधिकाऱ्यांनी कार्यालयातून धूम ठोकली. सुरक्षारक्षकांनीदेखील कार्यालयात धाव घेतली. परंतु पोटे यांच्या रुद्रावतारासमोर सुरक्षारक्षक शांत राहिले आणि प्रकाश पोटेंनी सुरक्षारक्षकासमोर अधिकाऱ्यांच्या दालनात तोडफोड केली.

या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. लोकशाही मार्गाने केलेल्या तक्रारीची दखल घेत नसल्याने माणसाला या थराला जावे लागते, अशी प्रतिक्रिया येत आहेत.

Prakash Pote, NCP Politics
Rohit Pawar Vs Ram Shinde : पेपर लोकसभेचा; पण रोहित पवार अन् राम शिंदेंची तयारी विधानसभेची

प्रकाश पोटे म्हणाले, 'जलजीवनचे काम निकृष्ट सुरू आहे. याबाबत तक्रार करूनही कारवाई झाली नाही. कामासाठी आमचेच पैसे लागले आहेत. त्याचा अपव्यय होत आहे.'

निकृष्ट काम करून कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जात आहे. जनतेचा पैसा लुटला जात आहे. यात हे अधिकारीदेखील सामील आहेत, असा आरोप पोटे यांनी केला. या कामात सुधारणा न झाल्यास पुढचा नंबर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या दालनाचा असेल, असा इशाराही प्रकाश पोटे यांनी दिला आहे.

(Edited by Avinash Chandane)

R...

Prakash Pote, NCP Politics
Nagar News : पदभार घेतला अन् पहिल्याच दिवशी जातीय तणावाला सामोरे गेले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com