Dr. Babasaheb Deshmukh : माझ्या कार्यपद्धतीत दमदाटी नाही, तर कायदेशीर मार्ग असतो’ : आमदार बाबासाहेब देशमुखांचे सूचक विधान

Sangola Political News : सांगोला आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी गावभेटीत “दमदाटी नव्हे, कायदेशीर मार्गाचा अवलंब” असे सांगत सूचक विधान केले. नेमका कुणावर निशाणा साधला याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
Dr. Babasaheb Deshmukh
Dr. Babasaheb Deshmukh Sarkarnama
Published on
Updated on
  1. सांगोला येथील गावभेटीत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी “माझ्या कार्यपद्धतीत दमदाटी नसून कायदेशीर मार्गाचा अवलंब करतो” असा टोला लगावला, परंतु तो नेमका कुणावर आहे याची चर्चा रंगली.

  2. त्यांनी तालुक्यातील सर्वांगीण विकास, शेतकरी-तरुणांच्या समस्या आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी न्याय्य व कायदेशीर पद्धतीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

  3. स्पर्धा परीक्षार्थींसाठी सुसज्ज ग्रंथालय, नागरिकांच्या तक्रारींवर तत्पर कारवाई आणि दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची हमी दिली.

Solapur, 21 September : सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे त्यांचे आजोबा (स्व.) माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्याप्रमाणे शांत, संयमी स्वभावासाठी ओळखले जातात. कोणत्याही विषयावर ते संयतपणाने भाष्य करतात. मात्र, गावभेटदरम्यान आमदार देशमुख यांनी ‘माझ्या कार्यपद्धतीत दमदाटी हा प्रकार नसतो, तर कायदेशीर मार्गाचा अवलंब असतो,’ असा टोला लगावला. मात्र, देशमुखांनी नेमका कुणावर निशाणा साधला, याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख (Dr. Babasaheb Deshmukh) हे गावभेट दौऱ्यावर होते. त्यावेळी चोपडी (ता. सांगोला) येथील तुकाराम महाराज मंदिराच्या सभागृहात बोलताना हा टोला लगावला. मात्र, आमदारांनी तो टोला नेमका कुणाला लगावला, याचीच चर्चा तालुक्यातून होताना दिसत आहे.

डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, (स्व.) गणपतराव देशमुख यांनी ज्या पद्धतीने सांगोला (sangola) तालुक्याचा सर्वांगीण विकास केला, त्याच पद्धतीने तालुक्यातील सर्व गावांपर्यंत विकास पोचविण्याचे काम मी करणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, तरुणांच्या समस्या तसेच विविध प्रकारच्या सामाजिक समस्या स्थानिक नेतेमंडळींच्या मदतीने त्या सोडवल्या जातील.

तालुक्यातील कोणत्याही नागरिकावर कसल्याही प्रकारचा अन्याय झाला, तर सांगोला तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी सदैव तुमच्या सोबत असणार आहे. नागरिकांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडवताना कोणावरही अन्याय न होता, ही समस्या कशी सोडवली जाईल, याचा मी विचार करतो. माझ्या कार्यपद्धतीत दमदाटी हा प्रकार नसतो, तर कायदेशीर मार्गाचा मी अवलंब करत असतो, असेही आमदारांनी स्पष्ट केले.

Dr. Babasaheb Deshmukh
NCP SP MLA News : पवारांच्या आमदाराची मागणी एकनाथ शिंदेंनी तातडीने मान्य केली; मतदारसंघात मंत्र्यालाही पाठविण्याचा निर्णय

देशमुख म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगोला तालुक्यात लवकरच सुसज्ज ग्रंथालयाची सोय केली जाणार आहे, नागरिकांनी कधीही मला फोन करावा. तुमच्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असणार आहे. शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा तुम्ही लाभ घ्या, त्या योजनांबाबत काही अडचणी निर्माण झाल्यास तात्काळ गावामध्ये असणारे तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.

आगदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांची आपुलकीने चौकशी करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले.

Dr. Babasaheb Deshmukh
Ajit Pawar : होम ग्राउंडवर अजितदादा झाले ॲक्टिव्ह; भाजपलाही देणार जोरदार ‘टशन’
  1. प्र: डॉ. देशमुख यांनी गावभेटीत कोणता संदेश दिला?
    उ: कोणत्याही समस्येवर दमदाटी न करता कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्याचा संदेश दिला.

  2. प्र: विकासासाठी त्यांनी कोणते उपक्रम जाहीर केले?
    उ: स्पर्धा परीक्षार्थींसाठी सुसज्ज ग्रंथालय उभारण्याचे जाहीर केले.

  3. प्र: दिव्यांग बांधवांबाबत त्यांनी काय भूमिका घेतली?
    उ: त्यांच्या अडचणी जाणून घेऊन शासनस्तरावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

  4. प्र: त्यांच्या भाषणातील टोला कोणावर होता?
    उ: नेमके नाव न घेता टोला दिल्याने यावर तालुक्यात चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com