नागपूरच्या पोलिस आयुक्तांनी शोधून काढलाय पारदर्शक बदल्यांचा नवा पॅटर्न

राज्यातील पोलिसांच्या बदल्या पारदर्शक होण्यासाठी हा नागपुरी पॅटर्न पथदर्शी ठरणारा आहे.
Amitesh Kumar
Amitesh KumarSarkarnama

नागपूर - शासकीय बदल्या म्हंटल्याकी त्यातील राजकीय हस्तक्षेप, भ्रष्टाचार असे आरोप होतात. तसा आरोप महाराष्ट्रातील पोलिस दलातील बदल्यांच्या संदर्भात दोन वर्षांपूर्वी झाला होता. यावर नागपूरमधील पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी उपाय शोधून काढला आहे. या नव्या पद्धतीने गुढीपाडव्याच्या दिवशी नागपुरात पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या. राज्यातील पोलिसांच्या बदल्या पारदर्शक होण्यासाठी हा नागपुरी पॅटर्न पथदर्शी ठरणारा आहे. या बदल्यांच्या पद्धतीलाच आता नागपुरी पॅटर्न असे नाव पडले आहे. ( Nagpur Police Commissioner discovers new pattern of transparent transfers )

पोलिस दलातील बदल्यांच्या विषयावरून राज्याच्या राजकारणात दोन वर्षांपूर्वी आरोप-प्रत्यारोप, चौकशी व न्यायालयीन खटले झाले. त्याचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. नागपूरमध्ये पोलिसांनी बदल्यांत एक छोटा मात्र अत्यंत सकारात्मक बदल केला. तोच बदल सध्या नागपुरी पॅटर्न ठरत आहे.

Amitesh Kumar
29 वर्षांत 54 बदल्या झाल्याने आयएस अधिकारी वैतागला अन् म्हणाला...

नागपुरात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात अभिनव योजना अमलात आणली आहे. अमितेश कुमार यांनी एका वृत्तवाहिनीला या बाबत सांगितले की, नागपुरात सर्व पोलिस त्यांच्या बदल्यांसाठी पोलिस आयुक्तांच्या दारात आले. मात्र, त्यांना ना कोणाच्या शिफारशींची गरज आहे. ना छुप्या अर्थपूर्ण व्यवस्थेची. या अंतर्गत एकाच पदावर पाच वर्षे पूर्ण झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या 3 जागा विचारण्यात आले.

सर्व पात्र कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पसंतीच्या 3 जागा सुचवल्यानंतर सर्वाना एकाच वेळी पोलिस जिमखान्याच्या हॉलमध्ये बोलावण्यात आले. त्या ठिकाणी दर्शनी भागात लावलेल्या बोर्डावर नागपुरातील सर्व पोलिस ठाणी आणि पोलिसांच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असलेल्या जागांची माहिती देत, त्यापैकी रिक्त असलेल्या जागा ही बोर्डावर सर्वांना दिसेल अशा पद्धतीने दर्शविल्या गेल्या. त्यानंतर प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला समोर बोलावत त्याच्या पसंतीच्या जागा विचारत उपलब्ध जागेप्रमाणे बदल्या देण्यात आल्या.

Amitesh Kumar
परमबीर सिंग यांच्या जवळच्या पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या; दोन अधिकारी आधीच तुरूंगात

इच्छेप्रमाणे आणि पारदर्शक पद्धतीने बदल्या केल्यावर पुढील तीन ते पाच वर्ष संबंधित कर्मचारी उत्साहाने काम करून जास्त चांगले काम करत आहे. त्यामुळे बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक केल्या.

पोलिस कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तीन पसंतीप्रमाणे जागा शिल्लक राहिलेल्या नसताना, त्यांना उपलब्ध जागेप्रमाणे तिथेच नव्या पसंती विचारून शंभर टक्के पारदर्शकतेने बदल्या देण्यात आल्या. अशाच पद्धतीने काल ( शनिवारी ) गुढीपाडव्याच्या दिवशी अवघ्या तीन तासांत साडेसहाशे पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या पारदर्शकपणे, कोणत्याही शिफारशी शिवाय, अर्थपूर्ण व्यवहार न होता झाल्याने पोलिस कर्मचारी ही कमालीचे खुश झाले असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.

आज वर पोलिस दलात अशा पारदर्शक बदल्या पाहिल्या नव्हत्या. अशा सोप्या पद्धतीने होणाऱ्या बदल्यांमुळे आमचा उत्साह आणि वरिष्ठांवरचा विश्वास वाढत असल्याची पोलिस कर्मचाऱ्यांची सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com