नागवडे, मुरकुटे यांनी कडवा विरोध मोडत राखले सहकाराचे बालेकिल्ले

श्रीगोंद्यात राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade ), श्रीरामपुरात माजी आमदार भानुदास मुरकुटे ( Bhanudas Murkute ) यांनी कडवे आव्हान मोडित काढत साखर कारखान्याची एकहाती सत्ता राखली.
Rajendra Nagawade & Bhanudas Murkute
Rajendra Nagawade & Bhanudas MurkuteSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदे तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना व श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अधिक चर्चेत राहिली आहे. श्रीगोंद्यात राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade ), श्रीरामपुरात माजी आमदार भानुदास मुरकुटे ( Bhanudas Murkute ) यांनी कडवे आव्हान मोडित काढत साखर कारखान्याची एकहाती सत्ता राखली. त्यामुळे सहकारात राजेंद्र नागवडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची पकड अजूनही सहकारात कायम असल्याचे अधोरेखित झाले आहे. Nagwade, Murkute broke the bitter opposition and maintained the stronghold of cooperation

साखर कारखान्याचा जिल्हा असा अहमदनगरची ओळख आहे. त्यामुळे साखर कारखान्याच्या निवडणूकीतील राजकारणावरच लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या राजकारणाची गणिते ठरली जातात. श्रीगोंदे तालुक्यात एकाच वेळी कुकडी आणि सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे साखर कारखान्याची निवडणूक लागली. महिनाभरापूर्वी माजी आमदार राहुल जगताप यांनी कुकडी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळवले. मात्र साखर संघाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार आणि डाव्या विचारसरणीचे नेते सहकारमहर्षी स्व. शिवाजीराव नागवडे यांनी उभारलेल्या साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध न होता तेथे माजीमंत्री आमदार बबनराव पाचपुते, माजी उपाध्यक्ष केशव मगर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी कडवे आव्हान उभे केले होते.

Rajendra Nagawade & Bhanudas Murkute
नागवडे कारखान्यात राजेंद्र नागवडेंच्या पॅनेलची सरशी

राजेंद्र नागवडे, दीपक नागवडे, जिल्हा बॅंकेच्या संचालक अनुराधा नागवडे यांच्या नियोजनातून निवडणुकात सर्व 21 जागा एकहाती जिंकत राजेंद्र नागवडेच किंगवमेकर ठरले. विशेष म्हणजे मगर, शेलार, बाळासाहेब नहाटा यांच्यासह माजीमंत्री आमदार बबनराव पाचपुतेंच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांचाही निवडणुकीत पराभव झाला.

श्रीरामपूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या अशोक सहकारी साखर कारखाना निवडणूकीतही अशीच स्थिती होती. सातत्याने कारखान्यावर गैरव्यवहाराचे आरोप होत होते. कारखाना स्थापनेपासून सत्त्ता असलेल्या भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात या निवडणुकीत शेतकरी संघटनेचे नेते ॲड. अजित काळे यांच्यासह स्थानिक पातळीवरील मुरकुटे विरोधकांनी पॅनल उभा करत कडवे अव्हाण तयार केले होते. मुरकुटे यांच्या सून डॉ. वंदना मुरकुटे याच त्यांच्या विरोधात उभ्या होत्या. या निवडणुकीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांची प्रचारसभा झाली. मतदानानंतर मात्र साधारणपणे दोन ते आडीच हजार मताच्या फरकाने मुरकुटेंचे सर्वच 21 उमेदवार जिंकले. त्यामुळे नगर जिल्ह्यात राजेंद्र नागवडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची सहकारीत पकड कायम असल्याचे स्पष्ट होत असून त्या-त्या तालुक्यातील राजकीय समिकरणे आता बदलणार असल्याचे दिसत आहे.

Rajendra Nagawade & Bhanudas Murkute
भानुदास मुरकुटे म्हणाले, युवा पिढीने ‘अशोक’ चा इतिहास जाणून घेतला पाहिजे...

बिनविरोधसाठीच होतात प्रयत्न

अहमदनगर जिल्ह्यात बहुतांश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूका बिनविरोध करण्यावरच भर असल्याचे आतापर्यत झालेल्या निवडणुकांत पहायला मिळाले आहे. ज्ञानेश्वर, मुळा, पद्मश्री डॉ. विखे पाटील, कुकडी, वृद्धेश्वर, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याच्या निवडणुका बिनरोध झाल्या. आता काही निवडणुका होत आहेत. त्याही बिनविरोध करण्यावर भर असल्याचे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com