Sangli Politics : 'देशातील सर्वात मोठ्या 'टेंभू सिंचन' योजनेला दिवंगत आमदार बाबर यांचे नाव द्या'; शिवसैनिकांची मागणी!

MLA Anil Babar Tembhu Water Scheme : 'लोकांनीच आमदार अनिल बाबर यांना पाणीदार आमदाराची पदवी बहाल केली होती.'
Anil Babar
Anil BabarSarkarnama
Published on
Updated on

विद्याधर कुलकर्णी -

Sangli News : भारतातील सर्वात मोठी अशी बिरुदावली मिळवणारी टेंभू उपसा सिंचन योजना आहे. या योजनेचे जनक म्हणून दिवंगत आमदार अनिल बाबर नाव घेतले जात होते. बाबर यांचे नुकतेच अकाली निधन झाले. स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांचे नाव या टेंभू सिंचन उपसा योजनेला देण्यात यावे, अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे. सरकारने दिवंगत अनिल भाऊंचा सन्मान या योजनेला नाव देऊन करावा, अशी सर्वसामान्य जनता शिवसैनिक आणि मतदारांची इच्छा आहे. (Latest Marathi News)

Anil Babar
Ashok Chavan in BJP : भाजप प्रवेशानंतरही अशोक चव्हाण काँग्रेसमध्येच; म्हणाले 50 वर्षांची सवय सुटणार नाही...

लोकांनीच त्यांना पाणीदार आमदार म्हणून पदवी बहाल केली होती. या संपूर्ण टेंभू सिंचन योजनेचा गाढा अभ्यास अनिल बाबर यांचा होता. जिथे शासनाचे इंजिनियर अधिकारी हेही काही वेळा हतबल होत असत. त्यावेळी बाबर मात्र हे पाणी आपण कसे त्या शिवारापर्यंत घेऊन जाऊ शकतो, याची माहिती ते देत होते. इतका ध्यास आणि अभ्यास त्यांचा या योजनेसाठी होता. टेंभू सिंचन योजना ही दुष्काळी असणाऱ्या कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, सांगोला आदी तालुक्यांसाठी एक वरदान आहे. पण हा सगळा परिसर ओसाड आणि डोंगरी भाग असल्याने इथे प्रचंड अडचणी आहेत. तरी पण बाबर यांनी शासनातर्फे या सर्व अडचणींवर मात करत ही योजना शेवटच्या शेतकरी व घटकांपर्यंत पोहाेचवण्यासाठी अहोरात्र कष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शासनाकडून ही योजना काहीही करून पूर्ण करणार आहे, असा अट्टाहास त्यांचा कायम होता. त्यासाठी त्यांनी कोणत्याही सरकारमध्ये असताना मला कोणतेही पद नको, फक्त माझ्या या भागातील जनतेला आणि शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी या योजनेला भरघोस निधी द्या, एवढीच ते अपेक्षा करत होते. त्यांचे अकाली निधन होण्याच्या आधी या योजनेच्या सहाव्या टप्प्याला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. त्यावेळी ते मंत्रिमंडळाची बैठक सुरू असणाऱ्या दालनाच्या बाहेरच थांबून होते. जोपर्यंत मान्यता प्राप्त होत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही असा त्यांनी पण केला होता. ज्यावेळी या योजनेला मान्यता प्राप्त झाली, त्यावेळी त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता.

दुष्काळी असणाऱ्या सर्व पट्ट्यातील इंच न इंच जमीन ओलिताखाली आली पाहिजे, अशी त्यांची अखेरपर्यंत इच्छा होती. या टेंभू सिंचन उपसा योजनेसाठी त्यांनी जे योगदान दिले आहे. त्यांची भरपाई बाकी कोणत्याही पद्धतीने भरून येणार नाही. ग्रामीण भागातील जनतेशी व मातीशी इमान राखणारा हा लोकनेता होता. अशा या पाणीदार आमदार व लोकनेता अनिल बाबर (Anil Babar) यांचे नाव या दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू योजनेस देण्यात यावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक व जनता करत आहे. इतक्या मोठ्या मनाच्या लोकनेत्याचा सन्मान या कामाने प्राप्त होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

Anil Babar
Ajit Pawar Ncp : अजितदादांनी कार्यकर्त्यांना दिली 'ही' शपथ; म्हणाले, "सार्वजनिक जीवनात..."

शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव (बापू) पवार यांनी याबद्दल मुख्यमंत्री एकनाथज शिंदे यांच्याशी आम्ही भेट घेऊन तमाम शिवसैनिकांच्या तर्फे ही मागणी करणार असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य समन्वयक गौरव गुळवणी यांनीही याविषयी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे यांना पत्रव्यवहार व समक्ष भेटून लवकरात लवकर नाव देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com