नरसिंहरावांनी अजित पवारांना खासदारकीचा राजीनामा केव्हा द्यायचा, हे स्पष्ट सांगितलं होतं...

अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी ते खासदार होऊन दिल्लीत गेले होते त्यावेळचा किस्सा सांगितला.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील पोलिस ठाणे इमारत, बसस्थानक, पंचायत समिती इमारत उद्घाटन तसेच शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आदी कामांचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना अजित पवार यांनी ते खासदार होऊन दिल्लीत गेले होते त्यावेळचा किस्सा सांगितला. हा किस्सा सांगताना त्यांनी माजी खासदार कै. शंकरराव काळे यांच्या स्मृती जागविल्या. ( Narasimha Rao had clearly told Ajit Pawar when to resign as MP ... )

या कार्यक्रमाला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे, माजी आमदार अशोक काळे, आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, दादाभाऊ कळमकर, चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले, रयत शिक्षण संस्थेच्या मिनाताई जगधने, श्रीरामपूर नगरपालिकेच्या अध्यक्षा अनुराधा आदिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी, राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, चैताली काळे, सुरेश वाबळे आदी उपस्थित होते.

Ajit Pawar
राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात - अजित पवार

अजित पवार म्हणाले, अहमदनगर जिल्ह्याने अनेक मोठे नेते दिले. यात शंकरराव काळे यांचा समावेश होता. 1991साली पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान झाले. त्यावेळी शंकरराव काळे कोपरगाव मतदार संघातून खासदार झाले. त्याच निवडणुकीत मी बारामती मतदार संघातून खासदार झालो होतो. मी त्यावेळी तरूण होतो. अंकुशराव टोपे, शंकरराव काळे, डॉ. वसंतराव पवार, मी असे महाराष्ट्रातील खासदार होतो. त्यांच्यात वयाचा मोठा फरक असला तरी सर्वांनबरोबर काम केले.

ते पुढे म्हणाले, मला खासदार म्हणून केवळ सहा महिनेच काम करण्याची संधी मिळाली. तेव्ही पी.व्ही. नरसिंहराव यांनी मला सांगितले होते, अजित तू पहिला विश्वासदर्शक ठराव होईपर्यंत थांबायच, त्यानंतर तू राजीनामा द्यायचा. तुझ्या जागेवर ज्येष्ठ नेते शरद पवार येतील आणि त्यांच्या जागेवर तू जायचं, अशा पद्धतीने आमचे या नेत्यांशी फार जुने स्नेह होते. कुठेही जाताना महाराष्ट्रातील त्या तत्कालीन ज्येष्ठ खासदारांबरोबर मी जात असे. त्यांच्या बरोबर महाराष्ट्र सदनात एकत्र रहायचो. त्यामुळे वडीलधाऱ्या नेत्यांना जवळून पाहण्याची मला संधी मिळाली, असे अजित पवारांनी सांगितले.

Ajit Pawar
...म्हणून थोरातांच्या कारखान्यात विखे होते चेअरमन

नगर जिल्ह्याचा इतिहास लिहिताना शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे, भाऊसाहेब थोरात, मारुतराव घुले, बाळासाहेब विखे पाटील, बाबूराव तनपुरे, आबासाहेब निंबाळकर, यशवंतराव गडाख या मान्यवरांनी आपापल्या परीने आपल्या परिसर पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला. ती ताकदीची माणसे होती. देवळाली प्रवरा माझे आजोळ. अनेक वेळा सुटीला मी अण्णासाहेब पाटील कदम यांच्या वाड्यावर यायचो. त्यामुळे हे सर्व मी ऐकायचो. काहींची पुस्तके वाचायचो. या नेत्यांनी साखर कारखानदारी कशी चालवायची हे महाराष्ट्राला दाखवून दिले. आम्ही महाराष्ट्र भर फिरतो मात्र कधी निवडणूक लढविण्यासाठी मतदार संघ सोडला नाही. मात्र शंकरराव काळे यांनी कोपरगाव मतदार संघ सोडून पारनेर व राशिन सारख्या ठिकाणी निवडणूक लढविली व विजयी झाले. याचे श्रेय त्यांच्या संघटन कौशल्य व जनाधार मिळविण्याच्या ताकदीला दिले पाहिजे असे अजित पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com