Satara NCP : राष्ट्रवादी 'युवक'ने केला एप्रिल फूल दिनी मोदी सरकारच्या विकासाचा वाढदिवस

Narendra Modi २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी युवकांना दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. पण, प्रत्यक्षात रोजगार उपलब्ध केला नाही.
NCP Youths Andolan
NCP Youths Andolansarkarnama
Published on
Updated on

Satara News : राष्ट्रवादी युवक काँग्रेसने NCP आज एप्रिल फूल दिवस हा मोदी सरकारचा Modi Government विकासाचा वाढदिवस म्हणून केक कापून अनोखे आंदोलन केले. यावेळी कमल का फूल एप्रिल फूल, एकही भुल कमल का फूल तसेच वाढती महागाई, बेरोजगारी विरोधात घोषणा दिल्या.

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी युवकांना दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. पण, प्रत्यक्षात रोजगार तर दिलाच नाही. परंतू रेल्वे ,एअरपोर्ट व अनेक सरकारी संस्था विकून व खाजगीकरण करून असलेले रोजगार गेले. १०० स्मार्ट सिटी बनवणार, पेट्रोल डिझेलचे दर तसेच महागाई कमी करणार अशी अनेक आश्वासन दिली होती.

त्यांनी भारतातील जनतेला एप्रिल फूल केले. कारण यामधील कोणतीच आश्वासने पूर्ण करू शकलेले नाहीत. म्हणून राष्ट्रवादी युवकने एप्रिल फूल हा दिवस मोदी सरकारचा विकासाचा वाढदिवस म्हणून साजरा करत असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गोरखनाथ नलवडे यांनी यावेळी सांगितले.

NCP Youths Andolan
NCP-Shinde group Politics : नरेश म्हस्केंच्या आरोपांना अजित पवारांचे उत्तर; असल्या आलतू फालतू...

या आंदोलनात राष्ट्रवादी विद्यार्थीचे सेलचे अध्यक्ष अतुल शिंदे, तालुकाध्यक्ष मंगेश ढाणे , ॲड. वैभव मोरे, सचिन जाधव, विकास अवघडे, सागर पवार, तुषार गुरव, प्रथमेश पवार, महेश जाधव, स्वप्नील वाघमारे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

NCP Youths Andolan
Koregaon market committee : पक्षाअंतर्गत खो-खो, कबड्डीचा खेळ नको; रामराजे नाईक-निंबाळकर स्पष्टच बोलले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com