भाजप हा राज्यातील चोरांची वरात तर,सोमय्या वरातीचे 'बँडवाले'

बीड (Beed) येथीस आष्टी तालूक्यात नगरपंचायतीच्या निवडणूकीच्या प्रचारसभेत बोलताना नवाब मलिकांनी (Nawab Malik) किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे.
Nawab Malik- Kirit Somaiya 

Nawab Malik- Kirit Somaiya 

Published on
Updated on

बीड : ''भाजप हा पक्ष राज्यातील चोरांची वरात आहे. तर, किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे या वरातीचे बँड बाराती आहेत. माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत, मी पण त्यांच्यासाठी चहा बिस्कीटे तयार ठेवली आहे. माझ्याविरोधात तपास यंत्रणांना कितीही कारवाया करायला सांगितल्या तरी मला त्याचा काहीह फरक पडणार नाही. मी कोणालाही घाबरत नाही. असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आज नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ बीड (Beed) येथील आष्टीच्या (Ashti) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात प्रचारसभेत त्यांनी आष्टीतील जनतेला संबोधित केले. भाजपाकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात सूडबुद्धीने तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. महाराष्ट्रात एक वेगळी परस्थिती निर्माण झाली आहे. काही नेते स्वतःला राजकीय चाणक्य समजत होते. मात्र आमच्या चाणक्याने सगळ्यांना मात देऊन सरकार आणलं, असे म्हणत नवाब मलिकांनी भाजपला टोला लगावला आहे.

<div class="paragraphs"><p>Nawab Malik- Kirit Somaiya&nbsp;</p></div>
पठ्ठ्या कुठंय? दानवेंकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख

महाराष्ट्रात कोविड सारखी परिस्थिती निर्माण झाली. पण याला जबाबदार कोण हा प्रश्न कोणी विचारत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आमची मागणी होती परदेशातील विमान बंद करा, मात्र हर्षवर्धन नावाचे मंत्री म्हणाले देशात कोरोना येणार नाही. नमस्ते टर्म देशात होणार होता त्यामुळं यांनी विमानसेवा बंद केली नाही. पण महाराष्ट्रात एकाही रुग्णांचा ऑक्सीजनविना मृत्यू नाही, असा खुसालाही त्यांनी केला.

यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यावरही टीका केली. अमित शहा म्हणाले निवडणुकी घ्या, मग पाहू, साहेब 6 महिन्याआधी लोकसभा निवडणूक झाली आमचीही निवडणूक घेयची तयारी आहे. आज देशात निवडणुका झाल्या तर भाजप देशातून हद्दपार होईल, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी विरोधकांवर आसूड ओढला,

तर ओबीसी आरक्षणावरही (OBC reservation) त्यांनी भाष्य केलं. ओबीसीच्या जागेवर आज निवडणूक होत नाही. केंद्रातील भाजप सरकार आरक्षण मुक्त भारत करू पाहातंय, पण हे भाजप कुणाचं आहे हे तुम्हाला माहिती आहे का, मंडल आयोगाला विरोध करायचं काम भाजपनं केलं होतं. जे लोक ओबीसी आरक्षणाविरोधात कोर्टात जात आहेत त्यांना भाजपचे पाठबळ आहे. एका एका वकिलांची फिस 10-10 लाख रुपये आहे, त्यांना भाजप फिस देत आहे, असा खुलासाही त्यांनी केला.

काही लोक म्हणत होते ही सभा कशी होते, मात्र मी त्यांना सांगतोय आम्ही कायद्याने अन परवानगी घेऊन सभा घेत आहोत. बेकायदेशीर आम्ही काही करत नाहीत. ही निवडणूक राजकीय निवडणूक आहे. मात्र राजकीय काम करत असताना सामाजिक काम करणं बंधनकारक असतं.

खासदार म्हणजे घंट्याचा काटा, आमदार म्हणजे मिनिटं चा काटा असतो, आणि तिसरा काटा तुम्ही लावायचं काम करा. घडयाळ, छत्री, पंजा समोरील बटन दाबून आमच्या उमेदवारांना निवडून द्या, अशी विनंतीही यावेळी नवाब मलिकांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com