जुन्याच पदाधिकाऱ्यांच्या हाती नवी पदे देत राष्ट्रवादी सावरणार ढासळलेला बुरुज!

त्या बैठकीत भाजपविरोधात लढण्याची रणनीती ठरविण्याऐवजी स्वकीयांवरच नाराजी व्यक्त झाली होती.
BaliramSate-umeshPatil
BaliramSate-umeshPatilSarkarnama
Published on
Updated on

मंगळवेढा (जि. सोलापूर) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पंढरपूर-मंगळवेढा हा ढासळलेल्या बुरुजाची डागडुजी सुरू केली आहे. त्यासाठी जुन्याच पदाधिकाऱ्यांच्या हाती नव्या पदाची जबाबदारी देत पक्ष बांधणीच्या हालचाली सुरू आहेत. (NCP announces elected of office bearers in Mangalvedha taluka)

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ही जागा राज्यात सत्ता असतानाही राष्ट्रवादीला राखता आली नाही. महाविकास आघाडी सरकारबद्दल जनतेमध्ये रोष आहे, हे दाखवण्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले होते. तसेच, गेल्या दोन वर्षांतील राष्ट्रवादी काँग्रेसची जनतेचे प्रश्न सोडवण्याबद्दलची तळमळ म्हणावी तितकी दिसून आली नाही, असा घरचा आहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत मिळाला होता. सत्ता असून कामे होत नसल्याचे व वरिष्ठ पदाधिकारी फोन उचलत नसल्याच्या तक्रारी बहुतांश पदाधिकाऱ्यांकडून मांडण्यात आल्या होत्या. एकुणच त्या बैठकीत भाजपविरोधात लढण्याची रणनीती ठरविण्याऐवजी स्वकीयांवरच नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

BaliramSate-umeshPatil
अजितदादा, तुम्ही भावासारखे; एकुलत्या एका मुलाला आमच्यापासून हिरावून नेणारांना सोडू नका

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांनी त्या नाराजीत लक्ष घालून पदाधिकारी निवडी जाहीर केल्या आहेत. मात्र, त्यातही जुन्याच पदाधिकाऱ्यांच्या हाती नवी जबाबदारी देत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीची सुत्रे पुन्हा त्याच लोकांच्या हाती देण्यात आली आहे. नवे पदाधिकारी जनतेमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कसे प्रयत्न करतात, यावर पक्षाचे पुढील भवितव्य अवलंबून आहे.

BaliramSate-umeshPatil
शरद पवारांबरोबरच्या बैठकीतही ‘विठ्ठल’बाबत ठोस निर्णय नाही

मंगळवेढ्याचे शहराध्यक्ष मुजम्मिल काझी यांना जिल्हा कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे, तर त्यांच्या जागी रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांचे समर्थक चंद्रशेखर कौंडुभैरी यांना शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. तालुकाध्यक्ष भारत बेदरे यांनाही जिल्हा कार्यकारिणीत स्थान देत प्रकाश पाटील यांच्याकडे तालुकाध्यक्ष जबाबदारी देण्यात आली आहे. सोलापूर येथे आज नव्या पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष बळिराम साठे व कार्यकारी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, लतिफ तांबोळी, राजेंद्र हजारे, मानाजी माने, राहुल शहा, रामेश्वर मासाळ यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

राष्ट्रवादीचे मंगळवेढ्याचे नवे पदाधिकारी पुढीलप्रमाणे : भारत बेदरे-जिल्हा सरचिटणीस, मुझम्मिल काझी- जिल्हा सहसचिव, पी. बी. पाटील- तालुकाध्यक्ष, चंद्रशेखर कोंडुभैरी- शहराध्यक्ष, बसवराज रामगोंडा पाटील- तालुका कार्याध्यक्ष, नागन्नाथ राऊत- शहर कार्याध्यक्ष, तानाजी काकडे- जिल्हा उपाध्यक्ष आदी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com