Ajit Pawar : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस मोठा अन् काँग्रेस लहान भाऊ; अजित पवारांचा पटोलेंवर निशाणा

Nana Patole : कर्नाटक निकालातून समविचारी पक्षांना एकत्र येणे गरजेचे
Ajit Pawar, Nana Patole
Ajit Pawar, Nana PatoleSarkarnama

MVA News : आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीत जागावाटपावरून सतत कुजबूज सुरू असते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी (ता. १९) जागा वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटा घेतला. त्याला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी (ता. २०) थेटच उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोल्हापूमध्ये आयोजित एका कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील (MVA) जागा वाटपावरून नाना पटोलेंवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.

अजित पवार (Ajitv Pawar) म्हणाले, "राज्यात महाविकास आघाडी मजबूत ठेवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. तुमची जास्त ताकद असेल तर महाविकास आघाडीमध्ये महत्व टिकेल. यापूर्वी काँग्रेसच्या जागा जास्त होत्या. त्यामुळे वाटाघाटी करताना राष्ट्रवादी काँग्रेसला लहान भावाची भूमिका घ्यावी लागत होती. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. काँग्रेसच्या ४४ जागा आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ जागा आहेत. त्यामुळे आम्ही काँग्रेसपेक्षा मोठा भाऊ आहोत.

Ajit Pawar, Nana Patole
Sanjay Raut On Bjp : महाराष्ट्रात मुंडेंचा आणि देशात वाजपेयी, अडवाणींचा भाजप आता राहिला नाही...

दरम्यान, शुक्रवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जागा वाटप गुणवत्तेवरून होईल, असे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, "जागावाटपाचे प्रकरण लवकरच निकाली काढण्यात येईल. २१ मे रोजी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. त्यात काँग्रेसचे तीन नेते पाठवणार आहोत. सर्व जागा गुणवत्तेच्या आधारावर ठरवल्या जातील. तशीच चर्चा समितीमध्ये होईल."

सध्या जागावाटपावरून महाविकास आघाडीत सतत चर्चा सुरू असते. त्यातून ऐनवेळी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत आघाडीत कुठलीही चर्चा झालेली नाही. काँग्रेस (Congress) मात्र तयारीला लागल्याचे चित्र पटोले यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे.

Ajit Pawar, Nana Patole
Karnataka Cabinet News : काँग्रेसने मंत्रिमंडळात असे साधले जातीय समीकरण; दक्षिण कर्नाटकला झुकते माप

यावेळी अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे महत्वही पटवून दिले आहे. त्यासाठी त्यांनी कर्नाटक (Karnataka) निवडणुकीवर भाष्य केले. अजित पवार म्हणाले, आता समविचार पक्षांनी एकत्र यावे लागणार आहे. कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलरची मते घटली आहेत. भाजपची मतांवर कसलाही परिणाम झाला नाही. परंतु जेडीयूची मते काँग्रेसला आपल्याकडे वळविण्यात यश आले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com