Sanjay Raut On Bjp : महाराष्ट्रात मुंडेंचा आणि देशात वाजपेयी, अडवाणींचा भाजप आता राहिला नाही...

Shivsena : बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची श्रद्धा होती, ठाकरे परिवाराशी त्यांचे जवळचे संबंध होते.
Sanjay Raut On Bjp, Beed News
Sanjay Raut On Bjp, Beed NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News : बीडमध्येच काय, पण राज्यात देशात कुठेही असलो तरी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. भाजप आणि (Shivsena) शिवसेना हे एकाच रक्ताचे दोन सख्खे भाऊ आहेत, असं ते नेहमी म्हणायचे, अशी आठवण शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी बीडमध्ये सांगितली. गोपीनाथ मुंडे असते तर कदाचित आज युती आणि नाती टिकली असती, अशी खंतही राऊत यांनी व्यक्त केली.

Sanjay Raut On Bjp, Beed News
Shivsena V/s Shivsena UT Hingoli : वर्गणी जमा करून घर चालवतो ; तुम्ही मटका, दारू रेशनच्या हप्त्यावर जगता..

महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने राऊत बीडमध्ये आले होते. यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि शिवसेनेच्या नात्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे आणि देशात वाजपेयी, अडवाणींची भाजप आता राहिली नाही. शिवसेना आणि भाजप हे दोन रक्ताचे भाऊ आहेत, अशी गोपीनाथ मुंडे यांची भूमिका होती.

त्यांच्यानंतर सगळीच नाती तुटली, ते असते तर कदाचित युती आणि नाती तुटली नसती. (Beed News) गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी त्यांचा वारसा टिकवला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात अडचणी निर्माण होतात. त्या प्रत्येक वेळेला गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण होते.

विशेषत: पंचवीस वर्षापेक्षा जास्त शिवसेना भाजप युतीमध्ये होतो, एकत्र राहिलो कधी मतभेद झाले असतील, पण ते दुर करणारी मंडळी तेव्हा भाजपमध्ये होती. त्यात गोपीनाथ मुंडे कायम आघाडीवर असायचे. एक अत्यंत जिंदादिल, दिलदार, दिलखुलास असं राजकारणातलं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. शिवसेना-भाजपची युती रहावी आणि ती अखंड टिकावी हे त्यांचे कायम स्वप्न होते. जाहीरपणे बैठकांमध्ये त्यांनी ती भूमिका मांडली होती.

बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची श्रद्धा होती, ठाकरे परिवाराशी त्यांचे जवळचे संबंध होते. शिवसेना आणि भाजप हे दोन रक्ताचे भाऊ आहेत, अशी त्यांची भूमिका होती. नंतर ती सगळीच नाती तुटली त्यामुळे त्यांची आठवण येते. ते असते तर कदाचित युती तुटली नसती. आम्ही पाहिला तो भारतीय जनता पक्ष आता राहिला नाही. वारसा असतो, मात्र त्या नेतृत्वाची बरोबरी कोणीही करू शकत नाही.

बाळासाहेब ठाकरे हे एकच व्यक्तिमत्व असे होते त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. तसेच गोपीनाथ मुंडे यांचीही बरोबरी कोणी करू शकत नाही. गोपीनाथ मुंडे ज्या निर्भयपणे राजकारणात वावरायाचे त्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली, त्यांनी अनेक कार्यकर्ते निर्माण केले, असेही राऊत यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com