नगर जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

अहमदनगर जिल्ह्यातील पालकमंत्री बदलाच्या चर्चा रंगत असतानाच पालकमंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांनी आज जिल्हा नियोजन समितीवर 20 सदस्यांची नियुक्ती केली आहे.
Ahmednagar
AhmednagarSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील पालकमंत्री बदलाच्या चर्चा रंगत असतानाच पालकमंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांनी आज जिल्हा नियोजन समितीवर 20 सदस्यांची नियुक्ती केली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसला झुकते माप मिळाले आहे. यात माजी मंत्री दिवंगत गोविंदराव आदिक यांचे पूत्र अविनाश आदिक, माजी आमदार नरेंद्र घुले यांचे पू्त्र क्षितिज घुले, राष्ट्रावादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांचे पूत्र ऋषिकेश ढाकणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत रामनाथ वाघ यांचे पूत्र जयंत वाघ व शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांचा समावेश आहे. ( NCP dominates Nagar District Planning Committee )

या नियुक्तीत संसद व विधीमंडळच्या सदस्यातून शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे व काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेल्या सदस्यांत प्रभाकर गाडे, अविनाश आदिक, बाबासाहेब दिघे, हर्षवर्धन अशोक बोठे यांची तर विशेष निमंत्रित सदस्यपदी शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले, ऋषिकेश ढाकणे, बाबासाहेब तरटे, पोपटराव दराडे, सोनाली रोहमारे, प्रवीण घुले, बी. आर. चकोर, जिल्हा सहकारी बँकेचे तज्ज्ञ संचालक मधुकर नवले, रामनाथ वाघ यांचे पूत्र तथा अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त जयंत वाघ, विशाल झावरे, संजय काशिद, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, भागवत मुंगसे, अभिजित खोसे यांचा समावेश आहे.

Ahmednagar
नगर जिल्हा विभाजनापेक्षा समतोल विकास झाला पाहिजे

या निवडीत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा भरणा आहे. मात्र यात राष्ट्रवादी काँग्रेसला झुकते माप मिळाले आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय व विश्वासू असलेल्या मधुकर नवले यांना जिल्हा बँकेनंतर जिल्हा नियोजन समितीवरही नियुक्ती मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com