राष्ट्रवादीच्या गटाचा सोमय्यांना घेराव, कारखाना परत मिळवून देण्याची सभासदांची मागणी

कारखाना सुरूच राहिला पाहिजे, शेतकरी, कामगार यांचे हित जपले पाहिजे. कारखाना बंद पडणार नाही. आमचा लढा हा केवळ चुकिच्या पध्दतीने लिलाव झाल्याच्या विरोधात आहे.
Kirit Somayya with farmers
Kirit Somayya with farmerssarkarnama
Published on
Updated on

सातारा : ''साहेब, तुम्ही काही करा पण सभासदांना पुन्हा कारखाना मिळवून द्या. हा कारखाना सभासदांचाच राहू द्यात,'' अशी मागणी जरंडेश्वरच्या सभासद शेतकऱ्यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडे केली. तर राष्ट्रवादीच्या एका गटाने श्री. सोमय्या यांना अडवत घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तसेच कारखाना सुस्थितीत सुरू असून आपल्या पवित्र्याने कारखाना बंद पडेल, शेतकरी व कामगार देशोधडीला लागतील, असा जाबही त्यांनी विचारला.

जरंडेश्वर कारखाना विक्रीत झालेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज जरंडेश्वर कारखान्यावर धडक मारली. यावेळी त्यांनी कारखान्याच्या गेटवर थांबून तेथे जमलेल्या जरंडेश्वरच्या सभासद शेतकऱ्यांशी संवाद साधला. ज्येष्ठ सभासद म्हणाले, सोमय्या साहेब आम्ही विचार करत आहोत, असे का घडले. हा कारखाना सामान्य माणसांचा आहे. हा कारखाना कोण गिळंकृत करत असेल तर आम्हाला बघवत नाही. तुम्हाल आमचे आवाहन आहे की तुम्ही काही करा, पण आम्हाला कारखाना पुन्हा मिळवून द्या. हा कारखाना सभासदांचाच राहू द्यात.

Kirit Somayya with farmers
सहकारातील चुकीच्या प्रवृत्तींवर कारवाई करा : अजित पवार

या कारखान्यासाठी आम्ही ४० वर्षे घालवली आहेत. ज्येष्ठ नेत्या डॉ. शालिनीताई पाटील यांनी आमच्यासाठी व कारखान्यासाठी खुप खस्ता खाल्या आहेत. कोरेगाव व खटाव तालुक्यातील जनतेने शालिनीताई पाटील यांना कारखाना उभारणीची मागणी केली होती. त्यानुसार ताईंनी अखंड संघर्ष करून कारखाना उभारला व चांगल्या पध्दतीने चालविला होता. मात्र, आता सत्तेच्या जोरावर बेकायदेशीर रित्या कारखाना ताब्यात घेतला आहे. आमची एकच इच्छा आहे. पुन्हा जरंडेश्वर कारखाना सभासदांच्या मालकीचा व्हावा.

Kirit Somayya with farmers
किरीट सोमय्या म्हणतात, ईडीची जप्ती आलेला जरंडेश्वर कारखाना अजित पवारांचा!

दरम्यान, याच वेळी राष्ट्रवादीचा एक गट कारखान्याच्या बाजूने भूमिका मांडण्यासाठी पुढे आला व त्यांनी श्री. सोमय्या यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी सोमय्या यांना अडवत कारखाना सुस्थितीत सुरू आहे. आपल्या भूमिकेमुळे कारखाना बंद पडेल. शेतकरी व कामगार देशोधडीला लागतील, असे ठणकावले. मात्र, यावर किरीट सोमय्या यांनी खुलासा करत सांगितले की, कारखाना सुरूच राहिला पाहिजे, शेतकरी, कामगार यांचे हित जपले पाहिजे. कारखाना बंद पडणार नाही. आमचा लढा हा केवळ चुकिच्या पध्दतीने लिलाव झाल्याच्या विरोधात आहे. कारखाना मुळ सभासदांना मिळाला पाहिजे. याबाबत उच्च न्यायालयाने लिलाव प्रक्रियोबाबत आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com