मुंबई : देशातील चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपला (BJP) यश मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील पक्षाच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. महाराष्ट्रात 2024 च्या विधानसभा निवडणुकीतही बहुमताने सत्तेत येऊ, असा असा दावा करीत आहेत. यावरून राजकीय धुळवड सुरू झाली आहे. भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. यावर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पडळकरांना आरसा दाखवला आहे.
शरद पवार (Sharad Pawar) हे साताऱ्यातील प्रचारसभेत पावसात भिजले आणि न्यूमोनिया भाजपला झाला, असा टोला लगावत पवारांवर टीका करणार्या आमदार गोपीचंद पडळकरांचाही (Gopichand Padalkar) तपासे यांनी समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, भाजपला महाराष्ट्रात सत्ता मिळवता आली नाही. हे त्यांचे दुःख आम्ही समजू शकतो. साताऱ्यातील पावसाळी सभेत पवारसाहेबांनी आव्हान केले आणि त्याला महाराष्ट्रातल्या तरुणांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे गोपीचंद पडळकर विसरले असावेत. पवारसाहेबांचे नाव घेतल्याशिवाय आमदार पडळकर यांना प्रसिद्धी मिळत नाही हे कळून चुकले आहे. म्हणूनच वारंवार पवारसाहेबांचे नाव घेऊन कुठेतरी प्रसिद्धी मिळविण्याची धडपड आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बहुमताने सत्तेत येऊ, असा दावा भाजपकडून केला जात आहे. याला शरद पवार यांनी उत्तर दिले होते. भाजपकडून होणाऱ्या आरोपांना घाबरू नका, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. शरद पवारांच्या या उत्तरावर भाजपनेही खुले आव्हान दिले आहे. भाजपने म्हटले आहे की, शरद पवारांनी भाजपची काळजी करु नये, स्वत:च्या पक्षाचे ६० च्या वर आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी १० वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात. ५५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.