शिंदेंचे काम जोमात; कोरेगावात राष्ट्रवादीचाच आमदार निवडून येणार.. सौ. चाकणकर

आमदार शशिकांत शिंदे MLA Shashikant Shinde यांना अपघाताने पराभवाला Defeat by accident सामोरे जावे लागले. मात्र, त्यानंतरही ते या मतदारसंघात जोमाने काम करत आहेत.
Rupali Chakankar, Shashikant Shinde
Rupali Chakankar, Shashikant Shindesarkarnama

पळशी : आमदार शशिकांत शिंदे यांचे काम जोमाने सुरू असल्याने कोरेगावात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून येईल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्या व महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस रमेश उबाळे यांच्या सातारा येथील तिरुपती निवासस्थानी रुपाली चाकणकर यांनी नुकतीच धावती भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी श्री. उबाळे यांनी पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची तसेच बालाजी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून सुरू असलेल्या समाजकार्याची माहिती दिली.

Rupali Chakankar, Shashikant Shinde
पावसातील सभेने भाजपची सत्ता उलथवली याचा राज ठाकरेंना विसर : शशीकांत शिंदे

त्याबद्दल श्री. उबाळे यांचे कौतुक करून रुपाली चाकणकर म्हणाल्या, "समाज कल्याण विभागातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्नशील राहा. आरोग्य व शिक्षण या प्रमुख विषयासंबंधीच्या विविध योजनांची माहिती देऊन तळागाळातील लोकांना मदत करत राहा. त्यासाठी पक्षाचे वरिष्ठ पातळीवरील नेते आपल्याला सर्वतोपरी मदत करतील."

Rupali Chakankar, Shashikant Shinde
साताऱ्याच्या दोन राजांना शशीकांत शिंदे दणका देणार?

''राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे विचार मानणारा कोरेगाव मतदारसंघ आहे. या ठिकाणी आमदार शशिकांत शिंदे यांना अपघाताने पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, त्यानंतरही ते या मतदारसंघात जोमाने काम करत आहेत. त्यामुळे कोरेगाव मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादीचाच आमदार निवडून येईल,'' असा विश्वास सौ. चाकणकर यांनी व्यक्त केला.

Rupali Chakankar, Shashikant Shinde
रूपाली चाणकरांनी ठणकावले, ...तर सरपंचाचे पद रद्द करू!

दरम्यान, सर्वसामान्य, वंचित, उपेक्षित घटकांच्या अडचणी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटीबद्ध असून, त्यासाठी गाव तिथं राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाची शाखा सुरू झाली पाहिजे, असेही सौ. चाकणकर यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com