NCP Satara News : राष्ट्रवादीच्या खासदारांचे रावसाहेब दानवेंना पत्र; म्हणाले, 'अमृत भारत योजनेचा...'

Raosaheb Danve News : रावसाबेब दानवेंना पत्र, साताऱ्याच्या राजकारणाची..
NCP Satara News
NCP Satara News Sarkarnama
Published on
Updated on

Satara News : शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना एक पत्र लिहिले असून कराड रेल्वे स्थानकाचा केंद्र सरकारच्या अमृत भारत योजनेत समावेश करण्याची मागणी केली आहे. कराड रेल्वे स्थानक, आदर्श रेल्वे स्थानकावरून राज्यासह परराज्यातील रेल्वे धावत असल्याने रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

खासदार श्रीनिवास पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कराड रेल्वे स्टेशन हे कराड परिसरातील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेच्या पुणे-मिरज मार्गावर असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. याचा फायदा अनेक रेल्वे प्रवाशांना होत आहे. मात्र काळानुरूप या स्थानकाचे आधुनिकीकरण करणे गरजेचे बनले असून केंद्र सरकारच्या अमृत भारत योजनेअंतर्गत कराड रेल्वे स्टेशनवर विविध सुधारणा करणे आवश्‍यक आहेत.

यामध्ये दर्शनी भागाची सुधारणा करावी. स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील दर्शनी भागाच्या सुधारणेसह प्रवेशद्वाराची तरतूद करण्यात यावी. वाहन तळाची सोय आणि लँडस्केपिंगसह अभिसरण क्षेत्राचा विकास करण्यात यावा. पार्किंगच्या ठिकाणापासून प्रवेशद्वारापर्यंत आच्छादित पादचारी मार्ग बनवावा.'

रेल्वे प्लॅटफॉर्मच्या संपूर्ण कव्हरेजच्या तरतूदीसह पृष्ठभाग सुधारणा करावी. दोन्ही प्लॅटफॉर्मवर दोन लिफ्ट आणि दोन एस्केलेटरची स्थापना करावी. आसन सुविधा सुधारण्याकरिता वेटिंग रूम आणि प्लॅटफॉर्मवर बसण्याची क्षमता सुधारून अतिरिक्त मॉड्यूलर फर्निचरची व्यवस्था करावी. नवीन आणि सुधारित शौचालये बसवून पाणी पुरवठा व्यवस्थेत सुधारणा करावी. दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र पार्किंगची जागा उपलब्ध करून द्यावी. अतिरिक्त पाणीपुरवठा टाकीसह सर्व ठिकाणी पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पाण्याच्या केबिनचे अपग्रेडेशन करून प्रवाशांना स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे.

इमारतीच्या छताची डागडुजी करण्याबरोबर प्रतीक्षा कक्ष, आरक्षण कार्यालय आणि प्रवेशद्वार हॉलची अंतर्गत सुधारणा करणे गरजेचे आहे. स्थानक परिसरातील अभिसरण क्षेत्र, सर्व खोल्या, प्लॅटफॉर्मवर प्रकाशाचे अपग्रेडेशन होणे आवश्यक आहे. त्यासाठी हायमास्ट लॅम्प टॉवर व अन्य प्रकाश व्यवस्था करावी. प्रभावी ड्रेनेज सिस्टमची अंमलबजावणी करण्यात यावी. विविध ठिकाणी कचरा कंटेनरची तरतूद देखील केली जावी. तसेच आवश्यक ठिकाणी वृक्ष लागवड करून रेल्वे स्थानक परिसरात वनसंपदा जोपासावी अश्या विविध मागण्या खा.श्रीनिवास पाटील यांनी केल्या असून कराड रेल्वे स्थानकाच्या कायापालट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com