राम शिंदेंनी आंदोलन केलेल्या मंदिरात राष्ट्रवादीने गोमूत्र शिंपडले : विखेंचा आरोप

भाजप ( BJP ) उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) आज कर्जतमध्ये होते.
sujay vikhe
sujay vikheSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर : कर्जत नगर पंचायतची निवडणूक सुरू आहे. ही निवडणूक भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीतील भाजप ( BJP ) उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) आज कर्जतमध्ये होते. त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. NCP sprinkles cow urine in Ram Shinde's agitated temple: Vikhe's allegation

खासदार विखे म्हणाले, ही निवडणूक माजी मंत्री राम शिंदे यांची किंवा माझी नाही. माझी निवडणूक अडीच वर्षांनी आहे. शिंदेंची निवडणूक तीन वर्षांनी येणार आहे. पण या निवडणुकीत मागील तीन-चार दिवसांत जो प्रकार पहायला मिळाला तसा प्रकार आमच्या कुटुंबाने मागील 50 वर्षांत कधी पाहिला नाही. एका पक्षाचे उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यासाठी सत्ता पक्षातील माणसे जावीत अशा पद्धतीचे राजकारण पाहिले नव्हते. सत्ताधारी पक्षाची कामे घेणारा ठेकेदार आमच्या पक्षातील उमेदवाराला उचलून घेऊन जातो. निवडणूक अधिकाऱ्यासमोर भाजप महिला उमेदवार रडत होती. ऐवढे मोठे घडून सुद्धा दडपशाही करण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला.

sujay vikhe
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, सामान्यांची काळजी करा, तुरुंगात गेलेल्यांची नको...

ते पुढे म्हणाले, तुम्ही एकच लक्षात घ्या. निवडणुका होतील. आमच्याकडे केवळ मोजकेच उमेदवार राहिले आहेत. अशी परिस्थिती निवडणुकी पूर्वी असेल तर निवडणुकीनंतर काय होणार आहे, याचे चित्र त्यांनी निवडणुकी आगोदर दाखविले आहे. नगरसेवक महिलांना त्यांनी रडायला लावलं मग निवडणुकीनंतर सर्वसामान्य महिलांची काय स्थिती होणार आहे. याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता.

राम शिंदे यांच्या कामाच्या जोरावर नामदेव राऊत व इतर जण निवडून आले. आता ते भाजपमध्ये नाहीत. पण त्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल. ते जे विकासकामे मांडत आहेत. ती विकासकामे त्यांची नाहीत. मंत्रीपद मिळाल्यावर राम शिंदे यांनी कर्जतमध्ये सुधारणा केल्या. राम शिंदे यांनी गोदड महाराज मंदिरात आंदोलन केले म्हणून राष्ट्रवादीच्या लोकांनी गोदड महाराज मंदिर गोमूत्र शिंपडून साफ केले. एवढे गलिच्छ राजकारण काय भविष्य आपण कर्जतच्या पुढच्या पिढीला देणार आहेत, असा प्रश्न खासदार विखे पाटलांनी उपस्थित केला.

sujay vikhe
रोहित पवारांनी राम शिंदे यांच्याकडे पाहिलेही नाही...

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कर्जत मधील आहेत की भाड्याने बाहेरून आणले आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या कपड्यांपासून फ्लेक्स बोर्डापर्यंत सर्व काही साहित्य बारामतीचे आहे. ते झोपेतून उठल्या पासून रात्री झोपे पर्यंत प्रत्येक काम फोनवर विचारून करतात. ते कशाच्या जोरावर आश्वासन देत आहेत. मी लिहून देतो आज जर त्यांची सत्ता आली तर गोरगरिब जनतेची घरे, दुकाने जातील. गोरगरिबांचा प्रपंच वाचवायचा असेल तर तुम्हाला भाजप शिवाय पर्याय नाही. विकास झाला पाहिजे त्याला आमचा विरोध नाही, पण गोरगरिबांचा प्रपंच उद्धवस्त करून विकास व्हावा असे आम्हाला वाटत नाही. नामदेव राऊत सारखा माणूस त्यांच्या दडपशाहीला झुगारू शकला नाही, त्यांच्या पुढे तुम्ही काय आहेत. ही निवडणूक आमच्या प्रतिष्ठेची नाही. तुमच्या अस्तित्त्वाची आहे. आम्ही राहिलो नाही तर तुम्हीही राहणार नाहीत, असे ही त्यांनी सांगितले.

sujay vikhe
आमदार रोहित पवार यांची मंत्रीमंडळात वर्णी?

हार्दिक पटेल विषयी ते म्हणाले, कर्जतच्या प्रचारासाठी त्यांनी काय माणूस शोधून आणलाय. त्यांनी त्या माणसाचा इतिहास तपासला तर तुमच्या लक्षात येईल. 2015मध्ये या माणसाने राष्ट्रध्वज पायाखाली तुडविला होता. 2017मध्ये गुजरात पोलिसांच्या वाहने जाळली त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. त्याचा एका महिले बरोबर अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाला होता, अशा माणसाला यांनी उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आणले आहे. हा सोडून त्यांना दुसरा माणूस भेटला नाही. या लोकांचे ऐकूण तुम्ही मतदान करत असतील तर मला वाटले या पेक्षा दुर्दैवी काहीही नाही, अशी टीका विखे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com