Jayant Patil : शिवसेनेसारखा मजबूत पक्ष भाजपने फोडला; आता त्यांची नजर इतर पक्षांवर : पण, राष्ट्रवादी...जयंत पाटील थेटच बोलले

Jayant Patil News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भाजपवर टीका
Jayant Patil News
Jayant Patil NewsSarkarnama

Jayant Patil News : ''आज शिवसेनेसारखा मजबूत पक्ष भाजपने फोडला. आता त्यांची नजर इतर पक्षांवर आहे. पण पवार साहेबांच्या भक्कम नेतृत्वखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंधपणे काम करणार याचा दिलासा आपल्या सर्वांना काल मिळाला आहे,'' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

'एक तास राष्ट्रवादीसाठी' या उपक्रमानिमित्त वाळवा तालुक्यातील साखराळे येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत जयंत पाटील (Jayant Patil) बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, ''आज देशात एक वेगळी परिस्थिती आहे. महागाईचा आगडोंब उसळला आहे, बेरोजगारीने तरुण पिढी हैराण झाली आहे. मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या महत्त्वाच्या विषयांवर भर न देता इतर गोष्टींकडे लोकांचे लक्ष वळवले जात आहे. दुर्दैवाने देशातील माध्यमेही यात सहभागी होत आहे,'' अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.

Jayant Patil News
Maharashtra Political News : 'फडणवीसांच्या वक्तव्याची चिंता मुख्यमंत्री शिंदे अन् त्यांच्यासोबतच्या चाळीस वीरांनी करावी'

''महाविकास आघाडीच्या असंख्य सभा आज राज्यभरात पार पडत आहेत. मात्र, ज्या दिवशी ज्या शहरात सभा आहे त्याच शहरात भाजपतर्फे मोर्चे काढले जातात. या मोर्चांमध्ये बोटांवर मोजण्याइतकेच लोक असतात. मात्र, माध्यमे त्याला अधिक कव्हरेज देतात. मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे हेच भाजपचे (BJP) ध्येय आहे,'' असा आरोप पाटील यांनी केला.

''काही दिवसांपूर्वी आपल्या सर्वांचे आधारस्तंभ पवार (Sharad Pawar) साहेबांनी अचानक राजीनामा दिला. हा एक धक्काच होता. ज्यावेळी पवार साहेबांचे नेतृत्व स्विकारून आपण काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडलो त्यावेळी आपले ध्येय होते, एक विचार होता. साहेबांच्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे आपण सर्व अस्वस्थ झालो होतो.''

Jayant Patil News
Basavaraj Bommai News : कर्नाटकचे मुख्यमंत्री पुन्हा बरळले : ‘महाराष्ट्र एकीकरण समिती ही उचापती लोकांची संघटना; आम्ही त्यांचा बंदोबस्त करू’

''आज देशासमोर महत्त्वाचे प्रश्न आहेत. येत्या काळात महत्त्वाच्या निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत पवार साहेबांसारख्या नेतृत्वाने राजीनामा देऊन कसे चालणार होते. म्हणून आम्ही पवार साहेबांची मनधरणी करून पवार साहेबांना राजीनामा परत घेण्याची विनंती केली आणि त्यांनी ती स्वीकारलीही.'' असे पाटील यांनी सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com